🌟राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विद्यमान ३२ आमदारांसह नवीन ०६ उमेदवारांना देण्यात आली संधी🌟
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवार दि.२३ आक्टोंबर रोजी आपल्या ३८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये विधानसभेतील विद्यमान ३२ आमदारांसह नवीन ०६ उमेदवारांना संधी देण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उर्वरित उमेदवारांची यादी उद्या गुरुवार दि.२४ आक्टोंबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ३८ उमेदवारांच्या यादीत परभणी जिल्ह्यातील पाथरी,अमरावती शहर,अर्जुनी मोरगाव,इगतपुरी,नवापूर,मुंब्रा-कळवा याठिकाणी नवीन उमेदवार देण्यात आले आहेत विद्यमान ३२ आमदारांमध्ये ९ मंत्र्यांचा देखील समावेश आहे तर विधानसभा उपाध्यक्षांचा आणि चार महिला उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.
🔴राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेली ३८ उमेदवारांची पहिली यादी खालीलप्रमाणे :-
⏰बारामती - अजित पवार,
⏰येवला - छगन भुजबळ
⏰आंबेगाव - दिलीप वळसे पाटील
⏰कागल - हसन मुश्रीफ
⏰परळी - धनंजय मुंडे
⏰दिंडोरी - नरहरी झिरवाळ
⏰अहेरी - धर्मरावबाबा आत्राम
⏰श्रीवर्धन - आदिती तटकरे
⏰अमळनेर - अनिल भाईदास पाटील
⏰उदगीर - संजय बनसोडे
⏰अर्जुनी - मोरगाव - राजकुमार बडोले
⏰माजलगाव - प्रकाश सोळंके
⏰वाई - मकरंद पाटील
⏰सिन्नर - माणिकराव कोकाटे
⏰खेड - आळंदी - दिलीप मोहिते
⏰अहमदनगर शहर संग्राम जगताप
⏰इंदापूर - दत्तात्रय भरणे
⏰अहमदपूर - बाबासाहेब पाटील
⏰शहापूर - दौलत दरोडा
⏰पिंपरी - अण्णा बनसोडे
⏰कळवण - नितीन पवार
⏰कोपरगाव - आशुतोष काळे
⏰अकोले - डॉ. किरण लहामटे
⏰वसमत - चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
⏰चिपळूण - शेखर निकम
⏰मावळ - सुनिल शेळके
⏰जुन्नर - अतुल बेनके
⏰मोहोळ - यशवंत माने
⏰हडपसर - चेतन तुपे
⏰देवळाली - सरोज अहिरे
⏰चंदगड - राजेश पाटील
⏰इगतपुरी - हिरामण खोसकर
⏰तुमसर - राजू कारेमोरे
⏰पुसद - इंद्रनील नाईक
⏰अमरावती शहर - सुलभा खोडके
⏰नवापूर - भरत गावित
⏰पाथरी निर्मला उत्तमराव विटेकर
⏰मुंब्रा - कळवा - नजीब मुल्ला आदींचा समावेश आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.प्रफुल पटेल,प्रदेश सरचिटणीस आ.शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके,प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव,प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदींची उपस्थिती होती........
0 टिप्पण्या