🌟भारतीय जनता पक्षाचे नेते अविनाश ठाकरे यांची कार्यक्रम स्थळी भेट🌟
नागपूर :- महाराष्ट्र राज्यात सर्वत्र नवरात्र उत्सवा निमित्त विविध मंडळातर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात त्याच प्रमाणे नागपूर जिल्ह्यातल्या नरखेडा तालुक्यातील साखरखेडा गावा मध्ये मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी शिवगर्जना उत्सव मंडळ साखरखेडा यांच्या तर्फे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आणि शिवकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात गावाकऱ्यानी आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन कीर्तन सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी भाजप नेते अविनाश ठाकरे यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.
विक्की कावळे मित्र परिवार आणी डॉ. निखिल चाईल्ड अँड फॅमिली हेल्थ केअर क्लिनिक बाजारगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबीर आणी कीर्तन सोहळ्याचे 8 ऑक्टोबर ला आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप नेते अविनाश ठाकरे , दिनेश ठाकरे, डॉ. निखिल चिडाम, विक्की कावळे,ह. भ. प.किशोर ठाकरे महाराज, आणी इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पुष्पक परखे, निलेश आत्राम, विजय काटसरपे, नितेश राऊत, दर्शन चौधरी, निखिल राऊत, विकास रोडले, निखिल चिकने,श्रावण घाटोले ,जय पाठे,मंगेश पाठे,रोशन वाघाडे,करण कावळे, दुर्गादास इवनाते ,भावेश धानोरकर विकास राऊत, प्रिन्स वानखेडे , मंगेश चिमोठे,रितीक वानखेडे यांनी मोलाचे सहकार्य केले......
0 टिप्पण्या