🌟परळी तालुक्यातील लोणी येथील असंख्य युवक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षात प्रवेश....!


🌟युवक नेते राजेभाऊ फड यांच्या उपस्थितीत असंख्य युवक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश🌟

🌟राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलच्या तालुका सचिवपदी भागवत काचगुंडे यांची नियुक्ती🌟


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील लोणी येथील शेकडो असंख्य युवक कार्यकर्त्यांचा युवक नेते राजेभाऊ फड यांच्या उपस्थितीत जाहिर प्रवेश करण्यात आला. राजेभाऊ फड यांनी प्रवेश केलेल्या सर्वांच्या गळ्यात पक्षाचा रुमाल टाकून सर्वांचे स्वागत करून आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे अध्यक्ष गणेश देवकते यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. लोणी येथील युवा कार्यकर्ते भागवत काचगुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेल परळी वैजनाथ तालुका सचिवपदी राजेभाऊ फड यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.


     परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते राजेभाऊ फड यांच्या विधानसभा संपर्क कार्यालयात परळी तालुक्यातील लोणी येथील असंख्य युवक कार्यकर्ते यांनी युवा नेते राजेभाऊ फड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पार्टीत जाहीर प्रवेश केला. युवा नेते राजेभाऊ फड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभाकर काचगुंडे, रघुनाथ काचगुंडे, धम्म केदारे, प्रल्हाद सोनवणे, बंटी सोनवणे, कृष्ण देवकते, अमोल देवकते, तुकाराम काचगुंडे, गणेशराव देवकते, भागवत काचगुंडे, भगवान मंजुळ, सुदाम केदारे, पिकलं देवकते, संदिपान देवकते, अभिजित काचगुंडे, दत्ता काचगुंडे, अरुण काचगुंडे, अंगद सातपुते यांच्यासह असंख्य युवकांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला. 

         आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत.त्यांच्या विचारांनी व कार्याने प्रभावित होऊन अनेक युवक पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत. त्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. अनेक पदाधिकारी व तरुण सहकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशाने परळी विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना नक्कीच बळकट होईल व राष्ट्रवादीची ताकद देखील वाढणार आहे. त्यादृष्टीने सर्वांनीच पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम एकजूटीने करावयाचे आहे,असे आवाहन युवा नेते राजेभाऊ फड यांनी केले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आ.जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष आ. संदिप क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार परळी वैजनाथ राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलच्या परळी वैजनाथ तालुका सचिवपदी लोणी येथील युवा नेतृत्व भागवत कचगुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेभाऊ फड यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या विकासांत आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना अधिक मजबुतीने उभी कराल ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष जिवनराव देशमुख, भटक्या विमुक्त सेल अध्यक्ष गणेश देवकते, मुक्ताराम गवळी आदी उपस्थितीत होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या