🌟स्पर्धेचे पंच म्हणून खाजा कुरेशी,अयोध्या पवार,ऋतूजा पाटील, प्रल्हाद राठोड यांनी काम पाहिले🌟
परभणी (दि.२१ आक्टोंबर २०२४) : महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी दि.१९ आक्टोंबर २०२४ रोजी येथील जिल्हा क्रीडा बॅडमिंटन हॉल येथे आयोजित केलेली जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा उत्साहात सपंन्न झाली.
तायक्वांदो असोसिएशन, महाराष्ट्र ऑलिंपिक यांच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन श्री शिवाजी महाविद्यालयाचे संचालक पी.आर.जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बॉक्सींग असोसिएशनचे प्रशिक्षक धनंजय बनसोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मी मगर, प्रल्हाद राठोड, ऋतूजा पाटील, परभणी जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे तुकाराम ठोंबरे, पृथ्वीराज पाटील, अयोध्दा पवार यांच्यासह क्रीडा अधिकारी सुहास नाटकर, आरोग्य विभागाचे समन्वयक गजानन जाधव, मनपा क्रीडा अधिकारी राजकुमार जाधव, राजू कानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेचे पंच म्हणून खाजा कुरेशी, अयोध्या पवार, ऋतूजा पाटील, प्रल्हाद राठोड यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मनपा क्रीडा विभागातील कर्मचारी पांडुरंग दुधाटे, कैलास काकडे, सय्यद सादेक यांनी परिश्रम घेतले......
0 टिप्पण्या