🌟 महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन / बातम्या......!


🌟पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पंगारकरचा शिंदेंच्या गटात प्रवेश : विरोधकांची चौफेर टीका🌟 

✍️ मोहन चौकेकर

💫 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निवडणुकीच्या रिंगणात, पहिल्या यादीत 99 जणांची नावं  ; सख्ख्या भावांना तिकीट, तीन अपक्षांना उमेदवारी; नेत्यांची मुलंही मैदानात, भाजपच्या पहिल्या यादीची 5 वैशिष्ट्ये! ; महायुतीचा फॉर्म्युला अखेर समोर आलाच, अजितदादांच्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुन्हा डबल बार, भाजपच्या दुसऱ्या यादीत 'दे धक्का' असणार! 

💫 मंदा म्हात्रे, विद्या ठाकूर ते नमिता मुंदडा, भाजपच्या पहिल्या यादीत 13 महिलांना तिकीट; अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण भोकरमधून लढणार! ; भाजपने काही ठिकाणी भाकरी फिरवली पण घरातल्या घरात, आशिष शेलारांच्या भावाला तिकीट, गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी ; लोकसभेत पराभव, आता विधानसभेत पुन्हा तिकीट, भाजपचे बडे नेते 4  महिन्यात पुन्हा निवडणुकीच्या मैदानात.

💫 एससी आणि एसटीच्या जागेवर आपण उमेदवार देणार नाही, आपल्या विचारांशी सहमत असणाऱ्यांना आपण निवडून आणायचं, काही ठिकाणी उमेदवार द्यायचे; विधानसभा निवडणुकीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी रणशिंग फुंकले  ;मनोज जरांगेंनी दंड थोपटले! विधानसभेसाठी तीन कलमी कार्यक्रम

💫 महाविकास आघाडीचं ठरलं,शरद पवारांचा स्ट्राईक रेटवर भर, तर उद्धव ठाकरे अन् काँग्रेसनंही उमेदवार हेरले; आज यादी जाहीर करण्याची शक्यता!  

💫 माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, जागा वाटपचा पेच सोडवण्यासाठी शरद पवारांचा थेट दिल्लीला फोन ; माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी घेतली शरद पवारांची भेट, सिल्व्हर ओकवर खलबतं ; खदखद फेम कराळे मास्तर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता, वर्धा आणि आर्वीतून लढण्याची इच्छा, शरद पवारांची घेतली भेट 

💫 पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का; हडपसरमध्ये पाच माजी नगरसेवक सोडणार राष्ट्रवादीची साथ ; मंत्री तानाजी सावंतांचा पुतण्या शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर चर्चा; अनिल सावंत तुतारी फुंकणार असल्याची चर्चा 

💫 मैदान तेच, उमेदवारही तेच, कर्जत-जामखेडमध्ये पुन्हा रोहित पवार विरुद्ध राम शिंदे सामना रंगणार ; जर अमित ठाकरे माहिम विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार असतील, तर मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार; सचिन खरात यांनी दंड थोपटले 

💫 गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश ; चौफेर टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली जबाबदारी काढून घेतली 

💫 पुण्यातील ‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित तरुणीला पाच लाखांची नुकसान भरपाई, ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मिळणार मदत

💫 कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर 8 गडी राखून विजय, मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी; न्यूझीलंडने 1988 नंतर प्रथमच भारतात मिळवला विजय ; पराभवामुळे WTC फायनलमध्ये पोहोचण्याचे टीम इंडियाचं गणित बिघडलं! आता जिंकावे लागतील अनेक सामने

💫 भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे पाच मतदारसंघ खेचले, अनेक जागांवरही होणार परिणाम ? 

💫 कुर्ला विधानसभा मतदारसंघात मंगेश कुडाळकर हॅटट्रिक साधणार की मविआ ऐनवेळी धक्का देणार ?  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या