🌟सोने लुटावे लागणार नाही : आयुष्याचेच सोने होईल🌟
✍️ मोहन चौकेकर
1) पहिला रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.
2) दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.
3) तिसरा रंग आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा.*
4) चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.
5) पाचवा रंग बायकांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.*
6) सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.*
7) सातवा रंग स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.*
8) आठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.*
9) नववा रंग स्त्री पुरुष समानता ह्या विषयावर फक्त टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख न लिहिता ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न करू या.
* समाजाने व आपण सर्वांनी हे नऊ रंग पाळले तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील आणि अनेक आशिर्वाद देतील...मग प्रत्येक दिवस विजयादशमी असेल.
* सोने लुटावे लागणार नाही : आयुष्याचेच सोने होईल :-
घटस्थापनेच्या व नवरात्र महोत्सवाच्या आपणास सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पत्रकार मोहन चौकेकर मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख*🌹🌹💐💐
0 टिप्पण्या