🌟महाराष्ट्र राज्यस्तरीय अल्पसंख्याक समन्वय समिती जाहीर.....!


🌟अशासकीय सदस्यपदी नांदेड येथील रणजीतसिंघ गिल व अमरजीतसिंघ कुंजीवाले यांचा समावेश🌟

नांदेड (दि.१५ आक्टोंबर २०२४) - राज्याच्या अल्पसंख्याक विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनाबाबत राज्यस्तरीय समन्वय समिती जाहीर करण्यात आली आहे. या समितीच्या शासकीय सदस्यपदी नांदेडचे रणजीतसिंघ गिल व अमरजीतसिंघ कुंजीवाले यांची निवड राज्याचे अल्पसंख्याक विभाग उपसचिव मि.प. शेणॉय यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली आहे.

 राज्यातील अल्पसंख्याक समुदायाच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकासाकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात सदर योजनांचा लाभ शीख समुदायाला मिळवण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनास शिफारस करण्याकरिता समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्याचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या बारा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये 12 अशासकीय सदस्यांचा समावेश असून समन्वय समितीचे अध्यक्ष मुख्य सचिव व सदस्य सचिव म्हणून अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव आहेत. या बारा शासकीय सदस्यांमध्ये नांदेड येथील रणजीतसिंघ गिल व अमरजीतसिंघ कुंजीवाले यांचा समावेश करण्यात आला आहे.

     राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून शिख समाजाच्या सामाजिक अडचणीचे निराकरण करणे, अल्पसंख्याक असलेल्या शीख समाजाला लाभ मिळविण्यासाठी मार्गदर्शन व उपायोजना सुचविणे, शीख समाजाच्या अडचणींचा अभ्यास करून त्यांचा आर्थिक - सामाजिक उन्नती करता योजनांचा आराखडा निश्चित करणे, शिख समाजाकडून भविष्यात होणाऱ्या मागण्यांकरिता उचित शिफारसी करणे, श्री गुरुगोविंदसिंघजी, गुरुतेग बहादूरजी व इतर गुरु यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम - कार्यक्रमांचे उत्सवाचे आयोजनाची शिफारस करण्याची संधी नांदेड येथील हक्काचे रणजीतसिंघ गिल व अमरजीतसिंघ कुंजीवाले या दोन  युवा नेतृत्वांना मिळाल्याने शीख समुदायांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    त्यांच्या या निवडीबद्दल गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य मनप्रीतसिंघ कुंजीवाले, गुरमीतसिंघ महाजन, भागीदारसिंघ घडीसाज, ॲड. राजवंतसिंघ कदंब, अवतारसिंघ पहरेदार, गुरप्रीतसिंघ सोखी हरजितसिंघ चूग, भागींदरसिंघ तबेलेवाले, गुरुबचनसिंघ रागी, देवेंद्रपालसिंघ बुंगई, पूनप्रतापसिंघ सोहेल, भागिंदरसिंघ फौजी, हरपालसिंघ संधू, कुलवंतसिंघ नहेंग, बलजीतसिंघ दुकानदार, कुलप्रतापसिंघ कपूर, हरप्रितसिंघ पुजारी, रणजीतसिंघ चाहेल अमितसिंघ बुंगई, सराबजीतसिंघ होटलवाले, जगदीपसिंघ नंबरदार,  यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.....

         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या