🌟विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक : दि.06 ऑक्टोबर रोजी ते नांदेडला जाणार🌟
परभणी (दि.01 आक्टोंबर 2024) : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा हे 4 व 5 ऑक्टोबर 2024 रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दि. 4 ऑक्टोबर रोजी जालना येथून ते परभणी येथे मुक्कामी येणार आहेत. दि.05 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.00 वा. त्यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका आयुक्त व जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्यासमवेत बैठक होणार आहे. दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, समाजकल्याण अधिकारी, शिक्षणाधिकारी, लिड बँकेचे प्रतिनिधी, सफाई कर्मचाऱ्यांसाठी योजना राबविणारे संबंधित विभागाचे अधिकारी यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार आहे. दि. 6 ऑक्टोबर रोजी ते नांदेडला जाणार आहेत......
0 टिप्पण्या