🌟डॉ.रामेश्वर पवार हे सध्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून देखील कार्यरत आहेत🌟
पुर्णा [दि.२१ आक्टोंबर २०२४] - पुर्णा येथील स्वतंत्र सैनिक सूर्यभानजी पवार वरिष्ठ महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांचे प्राचार्य श्री डॉ.रामेश्वर पवार यांची महाराष्ट्र शासनाने माध्यमिक व उच्च माध्यमिक संभाजीनगर विभागीय मंडळावर सदस्य पदी निवड केली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभागीय संभाजीनगर कार्यकारी समितीच्या रिक्त पदावर माननीय शिक्षण मंत्री शालेय शिक्षण विभागाने अधिनियम 1965 कलम (6)1,वर्ग 3 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून ही नियुक्ती केली आहे.
डॉ.रामेश्वर पवार हे सध्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून देखील कार्यरत आहेत मराठवाड्यातील ग्रंथालय चळवळीचे आद्य प्रणेते म्हणून त्यांना ओळखले जाते यापूर्वी ते यापूर्वी ते येथील गुरु बुद्धी स्वामी वरिष्ठ महाविद्यालयात ग्रंथपाल पदावर देखील कार्यरत होते त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या या निवडीबद्दल माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम डाॅ.दत्तात्रेय वाघमारे अमृत कदम राजु एकलारे, डाॅ. विनय वाघमारे, प्रकाशजी कांबळे आदिनी अभिनंदन केले आहे...सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे
0 टिप्पण्या