🌟जिंतूर मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणून कॉंग्रेसचे सुरेश नागरे दाखल करणार उमेदवारी अर्ज🌟
परभणी (दि.२४ आक्टोंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघीतील कॉंग्रेस पक्षात बंडखोरी होण्याची चिन्हे दिसू लागली असून जिंतूर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाचे सुरेश कुंडलिकराव नागरे हे सोमवार दि.२८ आक्टोंबर २०२४ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
नागरे यांनी या निवडणूकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षास जागा सुटावी या दृष्टीकोनातून पक्षश्रेष्ठींकडे मोठा आग्रह धरला होता परंतु श्रेष्ठींनी अद्यापपर्यंत त्या अनुषंगाने कोणताही संकेत दिला नाही. त्यामुळे नागरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर नागरे यांच्यासह समर्थकांनी गुरुवारी सोशल मिडयामधून ‘आता आमचं ठरलंय, चला फॉर्म भरायला’ या आशयाचे पोस्टर्स व्हायरल केले असून त्याद्वारे सोमवारी सकाळी ०८.०० वाजता नागरिकांनी मोठ्या संख्येने जिंतूरात दाखल व्हावे असे आवाहनी केले आहे....
0 टिप्पण्या