🌟महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचे अवर सचिव अ.का.लक्कस यांनी केले आदेश जारी 🌟
महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापना संदर्भात शासनाचे अवर सचिव अ.का.लक्कस काल गुरूवार दि.१० आक्टोंबर २०२४ रोजी शासन आदेश क्रमांक : एमसीओ-२०२४/प्र.क्र.३६४/नवि-१४ अंतर्गत अध्यादेश जारी करुन उस्मानाबाद येथील सह आयुक्त (जिल्हा प्रशासन अधिकारी गट-अ) यांची पुर्णा नगर परिषद मुख्याधिकारी पदावर नियुक्ती केली असल्यामुळे पुर्णा नगर परिषदेच्या विस्कळीत कारभारात लवकरच उत्कर्षाची भर पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत
महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचे अवर सचिव अ.का.लक्कस यांनी जारी केलेल्या शासन आदेशात असे नमूद केले आहे की महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४(४) व ४(५) मधील तरतुदीनुसार नमूद केलेल्या मुख्याधिकारी गट-अ संवर्गातील अधिकाऱ्याची प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने बदली करण्यात येत असून उस्मानाबाद येथील सह आयुक्त (जिल्हा प्रशासन अधिकारी गट-अ) उत्कर्ष गुट्टे यांची पुर्णा नगर परिषद मुख्याधिकारी पदावर नियुक्ती केली यांची पदस्थापना परभणी जिल्ह्यातील पुर्णा नगर परिषद मुख्याधिकारी पदावर करण्यात आली असून श्री.गुटे यांनी पदस्थापना दिलेल्या पदावर रुजू होवून तसा अनुपालन अहवाल शासनास तात्काळ सादर करावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे......
0 टिप्पण्या