🌟मराठी विषयक शिक्षक महासंघाच्या हिंगोली जिल्हा प्रतिनिधीपदी प्रा.सुनिल कावरखे यांची निवड...!


🌟कनिष्ठ महाविद्यालय मराठी शिक्षक महासंघाच्या पुणे येथील बैठकीत प्रा.सुनिल कावरखे यांच्या निवडीची घोषणा🌟 

हिंगोली :- महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषयक शिक्षक महासंघाच्या हिंगोली जिल्हा प्रतिनीधी सुनिल कुमार कावरखे यांची नुकतीच निवड करण्यात आली.

   कनिष्ठ महाविद्यालय मराठी शिक्षक महासंघ यांची पुणे येथे नुकतीच एक महत्त्वापुर्ण बैठक पार पडली. या बैठकीस मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अविनाश अवलगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी महासंघाचे अध्यक्ष प्रा.सुनिल डिसले, कार्याध्यक्ष मनिषा रिठे, सचिव प्रा.बाळासाहेब माने आदीं मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीत हिंगोली जिल्हा प्रतिनिधी म्हणून वसमत तालुक्यातील आरळ येथिल अण्णपुर्णा देवी कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.सुनिल कावरखे यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी मान्यवरांनी त्यांना निवडीचे पत्र प्रदान केले.त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या