🌟महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना रजा बंदी.....!


🌟राज्याचे अप्पर महासंचालकाच्या आदेशाने राज्य पोलीस समन्वय अधिकारी डॉ.छेरिंग दोरजे यांनी केले आदेश जारी 🌟

मुंबई (दि.१६ आक्टोंबर २०२४) :- महाराष्ट्र राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुका २०२४ च्या अनुषंगाने राज्यात मंगळवार दि.१५ आक्टोंबर २०२४ रोजी पासून आचार संहिता लागू झालेली असून राज्यातील विधानसभेसाठी दि.२० आक्टोंबर २०२४ रोजी मतदान होणार असून यानंतर दि.२३ आक्टोंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार असल्यामुळे विधानसभा निवडणूक काळात पोलीस दलातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना रजा बंदी करण्यात आली असून राज्याचे अप्पर महासंचालकाच्या आदेशाने राज्य पोलीस समन्वय अधिकारी डॉ.छेरिंग दोरजे यांनी रजाबंदी संदर्भात दि.१५ आक्टोंबर २०२४ रोजी आदेश जारी केले आहे

राज्य पोलीस समन्वय अधिकारी डॉ.छेरिंग दोरजे यांनी रजाबंदी संदर्भात जारी केलेल्या आदेशात असे नमूद केले आहे की सदर कालावधीमध्ये अर्थात दि.१५ आक्टोंबर ते दिनांक २५ आक्टोंबर २०२४ पर्यंत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदर कालावधीमध्ये कोणत्याही अधिकारी व अंमलदारांच्या आवश्यक कारणाशिवाय इतर कोणत्याही मोठ्या रजा (वैद्यकीय रजा वगळून) शक्यतो मंजूर करु नयेत असेही नमूद करण्यात आले असून राज्यात निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये व राज्यातील विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडावी याकरिता विशेष खबरदारी म्हणून पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी रजाबंदी आदेश लागू करण्यात आहे....




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या