🌟परभणी जिल्ह्यातील पाथरीतून शिवसेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सईद खान यांची बंडखोरी.....!


🌟शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रीय समाज पक्षात जाहीर प्रवेश करुन मिळवली रासपकडून उमेदवारी🌟

परभणी (दि.२८ आक्टोंबर २०२४) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे विश्‍वासू म्हणून ओळखले जाणारे तथा शिवसेनेच्या अल्पसंख्यांक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी आज सोमवार दि.२८ आक्टोंबर रोजी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षात जाहीर प्रवेश करुन रासपची उमेदवारी मिळवली असून ते पाथरी विधानसभा मतदारसंघातून रासपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

              या मतदारसंघातून शिवसेनेस जागा सुटेल, असा विश्‍वास ते बाळगून होते. परंतु, महायुतीतून राष्ट्रवादीच्या हिश्श्यास जागा गेल्यानंतर सईद खान व त्यांचे समर्थक नाराज होते. या नाराजीतूनच सईद खान यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वीच संवाद मेळाव्यातून राष्ट्रवादीसह विटेकर कुटूंबियांवर जोरदार टिका टिप्पणी केली व आपण निवडणूक रिंगणात उतरणार आहोत, हे स्पष्ट केले. त्याप्रमाणे सोमवारी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना सईद खान यांनी आपण रासपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत, असे जाहीर करीत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवित आहोत, असे म्हटले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या