🌟पुर्णेतील विद्या प्रसारिणी सभेच्या हायस्कूलने जिल्हास्तरावर पटकाविला तृतीय क्रमांक....!


🌟'मुख्यमंत्री माझी शाळा सुदंर शाळा' अभियानांतर्गत विद्या प्रसारिणी सभेच्या हायस्कूला मिळाले ०३ लाख रूपयाचे बक्षिस🌟


पुर्णा :- पुर्णा येथील विद्या प्रसारिणी सभेच्या हायस्कूलने 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियान टप्पा दोन अंतर्गत व खाजगी व्यवस्थापन गटात जिल्हास्तरावर तृतीय कमांक पटकाविला आहे. सलग दूसऱ्या वर्षी या शाळेला ०३ लाख रूपयाचे बक्षिस मिळाले आहे.

राज्य शासनाने मागील वर्षापासून हे अभियान सूरू केले असून यंदा 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले. पायाभूत सुविधा, शासनाच्या ध्येय धोरणांची प्रभावी अंमलबजावणी व शैक्षणिक संपादणूक या मुख्य मुदयासह शाळा, शिक्षक, विद्यार्थी विकास विषयक विविध बाबी, समाज घटकांचे शालेय विकासात घेतलेले सहकार्य आदींचे मुल्याकंन करण्यात आले. केंद्र व तालुकास्तर मुल्यांकनात अव्वल स्थान प्राप्त केल्यानंतर ही शाळा शाळा जिल्हास्तरीय मूल्यांकनास प्रात्र ठरली होती. त्यात या शाळेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. मागील वर्षी या शाळेने तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळविले होते. अशी माहिती मुख्याध्यापक देविदास उमाटे यांनी दिली. सांघीक प्रयत्न, शालेय व्यवस्थापन व प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्यामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगीतले.

या यशाबददल शिक्षणाधिकारी माध्यमिक, आशा गरूड, शिक्षणाधिकारी प्राथमिक सुनील पोलास, उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, श्री येरमाळ, गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर, संस्थाध्यक्ष डॉ. दत्तात्रय वाघमारे, उपाध्यक्ष भिमराव कदम, श्रीनीवास काबरा, विजयकुमार रूद्रवार, उत्तमराव कदम, साहेबराव कदम, श्री.के.एल. काकडे, श्री.बी.बी.मोरे, सौ. विद्या पवार, डॉ. प्रेमचंद सोनी, ज्ञानदेव रणमाळ, डॉ. हरीभाऊ पाटील, सर्व संचालक मंडळ, पालकसंघ, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या