🌟बुलढाण्यातील कोमात गेलेल्या रुग्णाच्या उपचारासाठी कुटुंबाला धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांनी केली आर्थिक मदत.....!


🌟बुलडाण्यातील संजय बिरभाऊ हे कोमामध्ये गेल्यामुळे त्यांच्या औषधोपचारासाठी त्यांच्या पत्नीस दिली रोख ५० हजारांची मदत🌟


✍️ मोहन चौकेकर 

                                                                               बुलढाणा :  आज दिनांक- ०५  ऑक्टोबर २०२४ रोजी बुलडाणा शहरातील संगम चौक येथील सौ सोनल संजय बिरभाऊ ह्या आपल्या ग्राम. सव येथील आईसोबत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर  संजय गायकवाड यांना भेटण्यासाठी आल्या, त्यानंतर त्यांनी आमदार संजयभाऊ गायकवाड यांची भेट घेऊन माझे पती संजय रामधन बिरभाऊ गेल्या पावणे दोन वर्षापासून कोमामध्ये असल्याची माहिती दिली, मागील दोन वर्षा अगोदर शेगाव येथे दर्शनासाठी जात असताना निंबा फाट्याजवळ दोघा पती-पत्नीचा एक्सीडेंट झाला होता, यामध्ये  संजय बीरभाऊ यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे ते तेव्हापासून कोमामध्ये आहेत,तसेच त्यांच्या पत्नी सौ.सोनल बिरभाऊ यांचे देखील दोन्ही पाय पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना देखील खूप ईजा झालेली होती, तसेच तेव्हापासून त्यांची पत्नी एकाच जागी आहेत, आणि यांच्याकडून देखील पायाला ईजा झाल्यामुळे कोणतेही काम होत नाही,घरची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे आणि घरामध्ये कोणताही कर्तापुरुष नसल्यामुळे औषधोपचार करण्यास अडचणी येत आहे, अशी संपूर्ण परिस्थिती सांगितल्यानंतर  क्षणाचाही विलंब न लावता धर्मवीर आमदार  संजय गायकवाड यांनी त्यांना पुढील उपचारासाठी ५० हजार रुपयाची आर्थिक मदत दिली तसेच यापुढे काहीही मदत लागल्यास निसंकोच कधीही मला संपर्क करा असे सांगितले, यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह तारापूर सरपंच  प्रवीण जाधव, नितीन सुपे, नगरसेवक मंदार बाहेकर, शिवाजी लोखंडे,अनिल जगताप, ज्ञानेश्वर खांडवे तसेच असंख्य मित्रपरिवार आणि परिवारातील नातेवाईक उपस्थित होते...                                                           

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या