🌟राष्ट्रमाता इंदिरा गांधी शाळेच्या वतीने करण्यात आला सत्कार : फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे विद्यार्थ्यांना अवाहन🌟
पुर्णा तालुक्यातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल धनगर टाकळी शाळेचे पाच विद्यार्थी महाराष्ट्र राज्य युवक व क्रिडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रिडा विभाग परभणीच्या संयुक्त विद्यमाने 2024-25 शैक्षणिक वर्षांत आयोजित केलेल्या विविध क्रिडा स्पर्धेत विभागावर खेळल्याबद्दल गोदावरी शिक्षण संस्था संचलित राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक शाळेच्या वतीने तेजस्वीनी हालगे व आरती एडके विभागीय कुस्ती स्पर्धेत,कृष्णा कार्ले व मारोती रोडगे विभागीय जलतरण स्पर्धेत तर दिव्या रहाटकर गोळाफेक स्पर्धेत खेळल्याबद्दल गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामकिशन रौदंळे,सचिव दशरथ साखरे,संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डी.सी.डुकरे,जेष्ठ शिक्षक बी.एन.बेद्रे,क्रिडा मार्गदर्शक अजीम पठाण,चंद्रकांत कुलकर्णी,शेख मजरोद्दिन सर यांच्या हस्ते पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन उपरोक्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अनुशंगाने शाळेचे मुख्याध्यापक डी.सी.डुकरे यांनी दिवाळीचा सन हा प्रकाश पर्व व दिव्यांचा सन असून तो आनंदात,हर्षोल्हासात साजरा करा व फटाके हे सर्वच द्रष्टीने घातक असतात म्हणून फटाचकेमुक्त दिवाळी साजरी करा असे विद्यार्थ्यांना अवाहन करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी सांसकृतीक विभाग प्रमुख संग्राम सोळके यांनी सुत्र संचालन केले तर आभार प्रदर्शन एस.टी.महाजन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर.के.साखरे,कालिदास डुकरे,तुषार पाटील,विनायक दुधाटे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.....
0 टिप्पण्या