🌟नांदेड शहरातील गुरुद्वारा चौरस्त्यावरील धोकादायक लोखंडी पादचारी पुल तात्काळ हटवण्यात यावा....!


🌟सामाजिक कार्यकर्ते स.जगदीपसिंघ नंबरदार यांची मनपा आयुक्त/जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी🌟


नांदेड (दि.१४ आक्टोंबर २०२४) - शहरातील प्रख्यात सचखंड गुरुद्वारा चौकामध्ये महानगरपालिकेच्यावतीने 2008 साली लोखंडी पादचारी पूल उभा केला होता त्याचा वापर होत नसल्याने या उडानपुलामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सदर पूल हटवून मार्ग मोकळा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते जगदीपसिंघ नंबरदार यांनी केली आहे.

   गुरुतागदी सोहळा 2008 करिता यात्रेकरूंच्या सोयीसाठी पादचारी लोखंडी पूल उभारण्यात आला होता. या पुलाचा अपेक्षित वापर होत नसल्याने सदर पुलाचा वर्षभर कोणीही वापर करत नसल्याने हा पूल नाहक भुर्दंड झाल्याचे लक्षात येत आहे. परंतु शीख धर्मियांकडून दसरा, दिवाळी, बैसाखी व हल्ला मोहल्ला कार्यक्रमादरम्यान या पुलावर भाविकांची मोठी गर्दी कार्यक्रम पाहण्यासाठी होत असते. यादरम्यान एखादी दुर्घटना घडून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

      गुजरात येथील मोरंबी पूल कोसळून 30 ऑक्टोबर 2022 रोजी मोठी दुर्घटना घडून 140 जणांचा जीवित हानी झाली होती. त्यामुळे सदर पुलाची कोणतीही आवश्यकता नसल्याने सदर लोखंडी पादचारी पूल पूर्णपणे हटवून मार्ग मोकळा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते जगदीपसिंघ नंबरदार यांनी महानगरपालिका आयुक्तांसह जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या