🌟महाविकास आघाडीचे उमेदवार कदम यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी खा.संजय जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
परभणी (दि.२८ आक्टोंबर २०२४) :- परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार परभणीतील 'ढाण्या वाघ' शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख तथा पुर्णा तालुक्याचे भुमिपुत्र विशाल विजयकुमार कदम यांनी आज सोमवार दि.२८ आक्टोंबर रोजी गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाच्या साक्षिने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्यसभा सदस्य फौजिया खान,माजी आमदार विजय गव्हाणे,गंगाप्रसाद आणेराव यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते यावेळी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत समर्थकांनी त्यांच्या विजयाच्या जोरदार घोषणांनी संपूर्ण गंगाखेड हादरवून सोडले.
गंगाखेड विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उबाठा) गटाकडून परभणीचे जिल्हाप्रमुख विशाल कदम हे निवडणूक लढवत आहेत खासदार संजय जाधव,खासदार फौजिया खान,राष्ट्रवादीचे विजय गव्हाने,गंगाप्रसाद आणेराव यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला गंगाखेड शहरातील चिंतामणी मंदिर,बालाजी मंदिर,पोस्ट ऑफिस,श्री राम चौक मार्गे भव्य रॅली काढण्यात आली होती.या रॅलीत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते....
* परिवाराचं प्रेम जनसामान्यांच खंबीर पाठबळ आणि विजयाचा टिळा :-
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जाण्यापूर्वी प्रसार माध्यमांशी बोलतांना महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम म्हणाले की आज माझ्या आयुष्यातील ऐतिहासिक दिवस असून गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पुर्णा-पालम-गंगाखेड या तिन्ही तालुक्यातील तमाम मतदार माता-भगिनींसह जेष्ठ वडिलधाऱ्या मंडळींच्या आशीर्वादाच्या बळावर मी एक मोठी लढाई लढण्यासाठी निघालोय प्रथमतः आमच्या घराच्या देव्हाऱ्यात देवी-देवतांना वंदन केले छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुष, तमाम संतसमुदायाला नमन केले. मातोश्री, वडील व घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले यानंतरच मी आपणा सर्वांच्या खंबीर पाठबळावर आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गंगाखेड पोहोचलो आपणा सर्वांचे खंबीर पाठबळच माझ्या विजयाची नांदी असल्याचेही यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल विजयकुमार कदम म्हणाले.....
0 टिप्पण्या