🌟राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या दौऱ्याचा तपशील🌟
परभणी (दि.08 आक्टोंबर 2024) : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हे गुरुवार दि.10 ऑक्टोबर 2024 रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि. 10 ऑक्टोबर, 2024 रोजी दुपारी 2.35 वाजता हिंगोली येथून हेलिकॉप्टरने परभणी येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आगमन. दुपारी 2.40 वाजता पोलिस मुख्यालय येथून शासकीय विश्रामगृह परभणीकडे प्रयाण. दुपारी 2.50 वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथे आगमन व राखीव. दुपारी 3 ते 5 या वेळेत शासकीय विश्रामगृह, परभणी येथे विविध क्षेत्रातील तज्ञांसमवेत संवाद. रात्री शासकीय विश्रामगृह, परभणी येथे मुक्काम.
शुक्रवार दि.11 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.15 वाजता शासकीय विश्रामगृह, परभणी येथून पोलिस मुख्यालयाच्या मैदानावरील हेलिपॅडकडे प्रयाण. सकाळी 9.25 वाजता पोलिस मुख्यालय मैदानावरील हेलिपॅड येथे आगमन. सकाळी 9.30 वाजता हेलिकॉप्टरने यवतमाळकडे ते प्रयाण करतील......
*-*-*-*-*
0 टिप्पण्या