🌟विजयी खेळाडूची परभणी येथे होणाऱ्या शालेय मैदानी स्पर्धेसाठी करण्यात आली निवड🌟
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालक पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आर आर सी मैदानावर घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत. विद्या प्रसारिणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विजय संपादन केला असून विजयी खेळाडूची परभणी येथे होणाऱ्या शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे : 17 वर्षातील मुले :
1) शेख झिशान शेख मोहसीन - 200 मी. धावणे.-- प्रथम 2) सय्यद अरसलान सय्यद रशीद - 400 मी.धावणे - प्रथम
4/400 रिले संघ 17 वर्षे वयोगट - प्रथम
1)शेख झिशान शेख मोहसीन 2)सय्यद अरसलान सय्यद रशीद 3) करण विनोद जोगदंड 4) धम्मपाल महेंद्र खर्गखराटे 5) रुद्राक्ष मनोहर टेकाळे.
17 वर्षे मुली --1) वैशाली पवन धूत (3 कि. मी. चालणे ) प्रथम 2) माही जगन्नाथ कराळे (3000मी. धावणे-- प्रथम. 3) स्नेहल सदाशिव शिंदे(800मी. धावणे-- प्रथम
19 वर्षातील गट --1) श्रावणी संतोष शिंदे
(3 कि. मी.चालणे) प्रथम
2) शे.फैजान शे. समंदर(3 कि. मी. चालणे) प्रथम 14 वर्षातील मुले :1) योगेश उद्धव बोबडे ( थाळीफेक ) द्वितीय 2)श्वेता नारायण काळे (1500मी. धावणे)
आदी विजयी खेळाडूचे संस्था अध्यक्ष डॉ.दत्तात्रेयजी वाघमारे, सचिव विजयकुमार रुद्रवार,उपाध्यक्ष: भीमरावजी कदम, श्रीनिवासजी काबरा,उत्तमरावजी कदम, साहेबरावजी कदम, मुख्याध्यापक देविदासजी उमाटे, शिवदर्शन हिंगणे यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी खेळाडूस क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे व क्रीडा मार्गदर्शक सज्जन जयस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले.......
0 टिप्पण्या