🌟पुर्णा-गोदावरी नदीपात्रातील अवैध गौण खनिज वाळू उत्खननासह तस्करीला तहसिलदारांचा अकार्यक्षम कारभार जवाबदार.....!


🌟चोरट्या अवैध वाळूचे मोठ्या प्रमाणात साठे करणाऱ्या भ्रष्ट गुत्तेदारांवर तहसिलदार बोथीकर मेहरबान का ?🌟


परभणी/पुर्णा (विशेष वृत्त) :- 'उपरवाला मेहेरबान तो गधा पहलवान' एकंदर अशी अवस्था प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्ट नौकरशहांची झाली असल्यामुळे 'शासनाचा पगार घेऊन जनसामान्यांचची सेवा बजावण्यासाठी चालढकल करणारे नौकरशहा मात्र गौण खनिज वाळू तस्कर माफियांसह शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवून शासकीय विकासकामांच्या बांधकामासठी बेकायदेशीररित्या चोरट्या गौण खनिज वाळू/मुरुम/दगड खडीचा अवैध साठा करणाऱ्या भ्रष्ट बेईमान शासकीय गुत्तेदार बिल्डर लॉबीच्या सेवेसाठी मात्र खाल्ल्या मिठाला जागून एखाद्या चाकरमान्यासारखे सदैव तत्पर राहतात अशी दयनीय अवस्था महसूल प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांची झाली असल्याचा गंभीर प्रकार परभणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यात देखील पाहावयास मिळत आहे.


प्रशासकीय सेवेत कार्यरत असतांना आपल्या कर्तव्याचे देखील भान विसरलेल्या पुर्णा तहसिल प्रशासनांतर्गत येणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्यासह दस्तुरखुद्द तहसिलदार माधवराव बोथीकर यांनी देखील पुर्णा-गोदावरी नदीपात्रांतून प्रचंड प्रमाणात होणाऱ्या अवैध गौण खनिज वाळू उत्खननासह चोरट्या वाळू तस्करीसह कोट्यावधी रुपयांचे शासकीय महसूल बुडवून गौण खनिज वाळू तस्करांकडून प्रचंड प्रमाणात चोरट्या वाळूची खरेदी करुन त्या अवैध चोरट्या वाळूचे भले डोगरा एवढे साठे करणाऱ्या भ्रष्ट शासकीय गुत्तेदार/बिल्डर लॉबीला देखील खुली सुट दिल्याचे उघड झाले असून पुर्णा शहरातील पुर्णा-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील हिंगोली गेट परिसरात महारेल एमआयडीसी अंतर्गत सुरु असलेल्या उड्डाण पूलाचे बांधकाम करणाऱ्या गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा.ली.व महाराष्ट्र रेल इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन या बांधकाम गुत्तेदार कंपनीसह पुर्णा रेल्वे स्थानक क्रमांक एकचे अमृत भारत स्टेशन योजनांतर्गत नुतनीकरण करणाऱ्या गुत्तेदारासह तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये सुरू असलेल्या शासकीय विकासकामांच्या गुत्तेदारांनी प्रचंड प्रमाणात अवैध चोरट्या वाळूचे साठे करुन शासकीय महसूल बुडवल्या संदर्भात तहसिलदार माधवराव बोथीकर व महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संबंधित बेकायदेशीर केलेल्या चोरट्या वाळूचे साठे तात्काळ जप्त करुन संबंधित गुत्तेदारांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई करावी या संदर्भात पुराव्यानिशी दि.०५ ऑगस्ट २०२४ रोजी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी स्वतः तक्रार अर्ज दिला होता सदरील तक्रार अर्ज देतांना उड्डाण पूल बांधकाम गुत्तेदार कंपनी गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा.ली.या कंपनीच्या पुर्णा-पांगरा ढोणे मार्गावरील दुरसंचार विभागाच्या कार्यालयासमोरील बेकायदेशीर मिक्सर प्लॉन्टवर जवळपास १२०० ते १४०० ब्रास तर पुर्णा रेल्वे स्थानक क्रमांक एकच्या मागील बाजूस देखील चार/पाचशे ब्रास अवैध चोरट्या वाळूचा साठा उपलब्ध होता या तक्रार अर्जाची तात्काळ दखल घेऊन तहसिलदार माधवराव बोथीकर व महसूल प्रशासनातील अधिकारी नायब तहसिलदार प्रशांत थारकर यांनी कर्तव्यतत्परता दाखवून घटनास्थळी भेट देवून सदरील अवैध चोरट्या वाळूचे जप्त करणे आवश्यक असतांना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कारवाई करण्यास टाळाटाळ करीत संबंधित शासकीय गुत्तेदारांना अवैध वाळू साठ्याची विल्हेवाट लावण्याची संधी दिली परंतु महसूल प्रशासनातील सावळ्या गोंधळावर प्रकाशझोत टाकण्याच्या दृष्टीने काल शुक्रवार दि.२७ सप्टेंबर २०२४ रोजी जंग-ए-अजित न्युज वेबवृत्त वाहिनीने 'पुर्णा-गोदावरी' नदीपात्रांतील शासकीय संपत्ती असलेल्या गौण खनिज वाळूवर अक्षरशः दरोडे ? महसूल प्रशासनातील काही 'अवैध वाळू तस्कर हितकऱ्यांचे' चोरट्या वाळूसाठेबाज भ्रष्ट गुत्तेदारांशी जुळले धागेदोरे ? या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करतात कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या महसूल प्रशासनाला खडबडून जाग आल्याने आज शनिवार दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.१५ ते ११.३० वाजेच्या सुमारास महसूल प्रशासनाचे अधिकारी तथा नायब तहसिलदार प्रशांत थारकर यांना कारवाई वेळी वगळून पुर्णेचे तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्यासह महसूल विभागाचे तलाठी गणेश गोरे, सिद्धार्थ खिल्लारे, गौतम घाटे,मुरलीधर मोरे यांच्या पथकाने पुर्णा रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम करणाऱ्या गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा.ली/महाराष्ट्र रेल इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेट या कंपनीच्या आडगाव लासीना शिवारातील पुर्णा-पांगरा ढोणे मार्गावरील दुरसंचार विभागाच्या कार्यालयासमोरील मिक्सर प्लॉन्टवरील शेंकडों ब्रास रेती स्थळावर धडक देत कारवाईनाट्य रंगवले व शेकडो ब्रास अवैध वाळूसाठ्या ऐवजी केवळ ४५० ब्रास वाळूसाठा दाखवून आपल्या कर्तव्याशी दगलबाजी केली यानंतर संबंधित उड्डाण पूल बांधकाम गुत्तेदार कंपनी गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा ली या कंपनीला जप्त साठ्याच्या किंमतीपेक्षा दहापट दंडात्मक कारवाईसह अवैध शासकीय गौण खनिज वाळू चोरी प्रकरणी कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असतांना देखील तहसिलदार बोथीकर यांनी जप्तीतील अवैध चोरट्या ४५० ब्रास वाळू साठ्याच्या बदल्यात संबंधित बांधकाम गुत्तेदार कंपनीशी हितसंबंध जोपासत कंपनी कडून महाराष्ट्र गौरमेंटच्या नावाने दि.०१ आक्टोंबर २०२४ रोजी आरएसव्ही कंपनीचा नावाचा ०३ लाख ४६ हजार ५००/- रुपयांचा एचडीएफसी बॅंकेचा डिमांड ड्राफ्ट घेऊन संबंधित कंपनीला क्लिनचीट देण्याचा प्रयत्न केला परंतु सदरील प्रकरण अंगलट येण्याची शक्यता असल्याने दि.०३ आक्टोंबर २०२४ रोजी तहसिलदार बोथीकर यांनी उड्डाण पूल बांधकाम गुत्तेदार कंपनी गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा ली च्या नावाने जा.क्र.२०२४/गौ.ख./कावी अंतर्गत पुन्हा नोटीस काढून संबंधित कंपनीला खुलासा करण्याचे नोटीसीत नमूद करुन कारवाई करण्यास टाळाटाळ करण्याचा पराक्रम केला त्यामुळे या प्रकरणातून असे स्पष्ट होत आहे की पुर्णा तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रातील अवैध गौण खनिज वाळू उत्खननासह प्रचंड प्रमाणात होणाऱ्या अवैध चोरट्या वाळूरीला तसेच शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवून चोरट्या वाळूचे साठे करणाऱ्या भ्रष्ट शासकीय गुत्तेदार/बिल्डर लॉबीला तहसिलदार माधवराव बोथीकर व महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांचा वरदहस्त लाभलेला आहे.........

* उड्डाण पूल बांधकाम गुत्तेदार कंपनी गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा ली घ्या पुर्णा-पांगरा ढोणे मार्गावरील मिक्सर प्लॉन्टवर दि.०५ ऑगस्ट २०२४ रोजी जवळपास १२०० ते १४०० ब्रास अवैध चोरट्या वाळूचा साठा उपलब्ध होता त्याचा हा पुरावा:-





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या