🌟गावठी पिस्टलसह आरोपी सय्यद अमन यांच्यासह साथीदार सद्दाम शेख हनीफ देखील पोलिसांच्या ताब्यात🌟
परभणी : परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट परिसरातून काल शुक्रवार दि.१८ आक्टोंबर रोजी दहशतवादविरोधी शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने यशस्वी सापळा दोन आरोपींना गावठी पिस्टलसह ताब्यात घेण्याची धाडसी कारवाई केली होती.
दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकास गोपनिय माहिती मिळाल्यावरुन पथकाने आरोपी आरोपी सय्यद अमन सय्यद जफर यास गावठी पिस्टलसह काद्राबाद प्लॉट परिसरातील एका हॉटेलजवळून ताब्यात घेतले होते त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्याने साथिदार सद्दाम शेख हनीफ वय २४ वर्षे याचे नाव पथकास सांगितले. पोलिसांनी साथीदार शेख सद्दाम यालाही ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ०१-गावठी पिस्टल (अग्नी शस्त्र), ०१-मॅगझिन असा एकूण १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्यानंतर त्याच्याविरोधात नानलपेठ पोलिस स्थानकात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला
दरम्यान, ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात सपोनि अनिल कुरूंदकर, पोलीस अंमलदार मधूकर चट्टे, सुग्रिव केंद्रे, किशोर चव्हाण, योगेश चरकपल्ली, जावेद खान, शेख अबूजर, इम्रान खान यांनी मिळून केली.......
0 टिप्पण्या