🌟उद्योग जगतातील जागतिक कीर्तीचा देव माणूस काळाच्या पडद्याआड गेला - डी.सी.डुकरे


🌟पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळीतील राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूलच्या वतीने स्व.रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण🌟 

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल शाळेच्या वतीने भारताचे जागतिक किर्तीचे उद्योगपती रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.


या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डी.सी.डुकरे यांनी स्वर्गीय रतन टाटा यांच्या जीवनावर संक्षिप्त प्रकाश टाकला.साॅल्ट ते सॉफ्टवेअर असा रतन टाटा यांचा उद्योग जगतातील प्रवास,किल्लारी भुंकप कालावधीतील,कोवीड कालखंडातील रतन टाटा यांचे सामान्य माणूस,गोरगरीबांसाठीचे योगदान हे निश्चितच सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी असून उद्योग जागतातील असामान्य असलेले रतन टाटा अत्यंत साधे जीवन जगत असत आपल्या देशातील उद्योग जगतातील देव माणूस काळाच्या पडद्याआड गेला असेही डी.सी.डुकरे म्हणाले.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या