🌟गोपीचंद पडळकर,चैनसुख संचेती,दैवयानी फरांदे,विजय अग्रवाल,प्रकाश भारसाखळे आदींना उमेदवारी🌟
मुंबई - : विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी, 99 उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली होती. त्यामुळे, भाजपकडून आत्तापर्यंत 121 उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. दुसऱ्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेत्यांनाच संधी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.
भाजपच्या दुसऱ्या यादीत भाजच्या दुसऱ्या यादीत जतमधून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली असून मलकापूर मधुन चैनसुख संचेती तर अकोल्यातून विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली आहे. तर नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यासह, पुण्यातील तीन मतदारसंघात उमेदवार जाहीर झाले असून खडकवासलामधून भीमराव तापकीर, पुणे कंन्टोनमैंट मतदारसंघातून सुनिल कांबळे, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातून समाधान औताडे यांना तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे, प्रशांत परिचारक यांना संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. भाजपने जारी केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये विदर्भातील 9 मतदार संघाचा समावेश आहे. तर, पुण्यातून तीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. मात्र, भाजपच्या दुसऱ्या यादीत मुंबईतील एकही नाव नाही. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांना जत विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जत जनसंपर्क कार्यालयात सहकाऱ्यांनी पेठे भरवून अभिनंदन केले.
धुळे ग्रामीण- राम भदाणे
मलकापूर- चैनसुख संचेती
अकोट- प्रकाश भारसाकले
अकोला पश्चिम- विजय अग्रवाल
वाशिम- श्याम खोडे
मेळघाट- केवळराम काळे
गढचिरोली- मिलिंद नरोटे
राजुरा- देवराव भोंगले
ब्रह्मपूरी- कृष्णलाल सहारे
वरोरा- करण देवतळे
नाशिक मध्य- देवयानी फरांदे
विक्रमगढ- हरिश्चंद्र भोये
उल्हासनगर- कुमार आयलानी
पेन- रविंद्र पाटील
खडकवासला- भिमराव तापकीर
पुणे कॅन्टोन्मेंट - सुनील कांबळे
कसबा पेठ- हेमंत रासने
लातूर ग्रामीण- रमेश कराड
सोलापूर शहर मध्य- देवेंद्र कोठे
पंढरपूर- समाधान आवताडे
शिराळा- सत्यजित देशमुख
जत- गोपीचंद पडळकर
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या