🌟मराठवाडा प्रवासी संघटना दिवाळीत स्पेशल पुणे रेल्वेसाठी आंदोलनाचा पावित्र्यात.....!

🌟मराठवाडा प्रवासी संघटनेने दिले दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक नांदेड यांना निवेदन🌟 

परभणी (दि.23 आक्टोंबर 2024) नौकरी आणि कामधंदयाच्या निमित्ताने पुणे येथे असलेल्या नागरिकांना दिवाळी सणा करिता मराठवाडयात येण्यासाठी दमरे ने एकही स्पेशल गाडी घोषित न केल्याने मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या बाबत एक निवेदन नांदेड येथे विभागीय व्यवस्थापकांना दिले असून त्यात म्हटले आहे की शिक्षण आणि कामधंदयाच्या निमिताने मराठवाडयातील जवळपास चाळीस हजार विध्यार्थी,चाकरमानी पुणे येथून आपआपल्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी मराठवाड्यात येतात. 

मागील अनेक वर्षांपासून पासून दिवाळीत धनतेरस पासून भाऊबीज पर्यंत पुणे येथून विशेष रेल्वे दक्षिण-मध्य रेल्वे विभागाकडून चालवण्यात येत होती, मात्र या वर्षी दिवाळीला आता केवळ पाच सहा दिवस राहिले असताना देखील पुणे येथून मराठवाड्यात येणारे प्रवाश्यां करिता अदयाप एक ही रेल्वे उपलब्ध करून दिली नाही . दि २० सप्टेंबर रोजी नांदेडचे महाप्रबंधक याना प्रत्यक्ष भेटून नांदेड-पुणे, तसेच परभणी मार्गे नागपूर-पुणे दरम्यान विशेष रेल्वेसाठी निवेदन दिलीत. तरी देखील अद्याप दिवाळीत पुणेला विशेष रेल्वे दिली नसल्याने काल दि. २२ ऑक्टोबर रोजी प्रवासी महासंघाने महाप्रबंधक याना आणखीन एक निवेदन सादर करण्यात आली। मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळल्याने प्रवासी महासंघ आक्रमक झाली असून दि. २५  ऑक्टोबर पर्यंत पुणे ला जोडून विशेष रेल्वे घोषित न केल्यास परभणी स्थानकावर  दि .२७ ऑक्टोबर रोजी दक्षिण-मध्य विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

देशभरात प्रत्येक विभागात प्रवासी जनतेचा गरजेनुसार विशेष रेल्वे गाड्यांचे सोय करण्यात येत आहेत. त्याप्रमाणेच मराठवाड्यातील प्रवाश्यांची पुणे करिता आणखीन दोन दैनंदिन रेल्वे गाड्यांचे सतत मागणी आहे.  मात्र दक्षिण-मध्य रेल्वे विभागाकडून प्रवाश्यावर सतत अन्याय करण्यात येत आहे. दिवाळीला देखिल पुणे आणि नागपुर साठी विशेष रेल्वे गाड्यांतून वंचित ठेवण्यात येत आहे. सर्व सामान्य जनता, प्रवासी, विद्यार्थी, त्यांचा पालकवर्ग, महिला, व्यापारी इत्यादींवर होत असलेली अन्यायाचा निषेध करण्या करिता ऐन दिवाळीच पूर्वी दि. २७ आक्टोबर, रविवार रोजी दक्षिण-मध्य रेल्वे विभागाचा विरोधात तीव्र आंदोलन इशारा मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाकडून अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंडे, रूस्तम कदम, कदीर लाला हाशमी,  माणिक शिंदे, डॉ किरण चिद्रवार,केदार जाधव, विठ्ठल काळे,  रितेश जैन ,प्रवीण थानवी, बाळासाहेब देशमुख,डॉ राजगोपाल कलानी, दयानंद दीक्षित आदीने दिला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या