🌟परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघातील मतदार अधिकार्‍यांना आज दि.२७ रोजी मिळणार पहिले प्रशिक्षण....!


🌟अशी माहिती पाथरीचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली आहे🌟 

परभणी (दि‌.२६ आक्टोंबर २०२४) - परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघांतर्गत निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या २०८८ मतदार अधिकार्‍यांना आज रविवार दि.२७ आक्टोंबर रोजी पहिले प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

                त्याअनुषंगाने विटा रोडवरील शासकीय गोदाम येथे आयोजित केलेल्या या प्रशिक्षणाचे पहिले सत्र सकाळी ०९.०० ते दुपारी ०१.०० या वेळेत होणार असून यावेळी १ हजार ५० तर ०२.०० ते ०६.०० यावेळेत आयोजित केलेल्या दुसर्‍या सत्रात १ हजार ३८ मतदान अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सर्व मतदार अधिकार्‍यांना मतदानापूर्वी मतदान केंद्रावर करावयाचे काम व मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाने सुचवलेल्या प्रक्रिया संबंधी मतदान केंद्राध्यक्ष  मतदान  अधिकारी एक,  दोन, तीन  यांच्या कामाची विभागणी, आदर्श मतदान केंद्राची रचना, माहिती देण्यात येणार आहे. तसेच सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना ईव्हीएम मशीन हाताळणी मशीन सिलिंग इत्यादी प्रक्रिया प्रत्यक्षात समजून घेण्यासाठी प्रशिक्षण स्थळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. दरम्यान, आदेशात नमूद वेळेत सर्व नियुक्त मतदान अधिकार यांनी नवीन विटा रोडवरील शासकीय गोदाम येथे उपस्थित रहावे, अशा सूचना पाथरीचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिल्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या