🌟 महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या.......!


🌟नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील डिझेल डेपोतील डिझेल महाघोटाळ्याच्या तपासावर प्रश्नचिन्ह ?🌟

✍️ मोहन चौकेकर

💫 महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्र २०२९मध्ये एकट्या भाजपचंच सरकार येणार.. भाजप मेळाव्याच्या बैठकीत अमित शाहांचं मोठं वक्तव्य...

💫 एका पक्षाचं महाराष्ट्रात सरकार येऊ शकत नाही.. अमित शाहांच्या दाव्यावर अजित पवारांचं वक्तव्य.. तर शाहांची भविष्यवाणी हास्यास्पद, जयंत पाटलांची टीका... 

💫 नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील डिझेल डेपोतील डिझेल महाघोटाळ्याच्या तपासावर प्रश्नचिन्ह ? तपास सिबीआय/ईडीकडे देण्याची बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स.मनबीरसिंघ ग्रंथी यांची महाव्यवस्थापक अरुण कुमार जैन यांच्याकडे मागणी 

💫 अतिआत्मविश्वासामुळे आपली विकेट पडू देऊ नका, भाजपच्या मेळावा बैठकीत फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र.. उद्धव ठाकरेंचा जनाधार संपल्याचीही केली टीका.. 

💫 'लव्ह जिहाद'च्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा, अनेक प्रकरणात खोटी ओळख दाखवून लग्न झाल्याचाही उल्लेख

 💫 शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार... मेळाव्यासाठी तब्बल ४० हजार शिवसैनिकांची आसन व्यवस्था...फुटीनंतरचा तिसरा दसरा मेळावा...

💫 घटस्थापनेपर्यंत मविआचं जागावाटप बहुतांश पूर्ण होणार तर दसऱ्याच्या मुहूर्तावर तिन्ही पक्ष जागावाटप जाहीर करणार, बैठकीनंतर आव्हाडांची माहिती

💫राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुप्रिया सुळेंचं विधान

💫 शरद पवारांचा पुन्हा एकदा अजितदादांना धक्का...भोसरीचे माजी आमदार विलास लांडे फुंकणार तुतारी...  जुन्नरचे आमदार अतुल बेनके समर्थकही शरद पवारांच्या भेटीला...

💫 अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी  लागली, .स्वतःचीच बंदूक साफ करताना चुकून गोळीबार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रकृतीची विचारपूस

💫 अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर 

💫 अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून सुटलेली गोळी लागली, ICU मध्ये दाखल, तात्काळ शस्त्रक्रिया, सध्या प्रकृती स्थिर ;गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला 

💫 तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला!सत्ता आल्यास मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री, राजरत्न आंबेडकर यांची माहिती ; छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला नवी ओळख, निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता, 'सप्तकिरणांसह पेनाची निब' हे चिन्हदेखील ठरलं 

💫 संभाजी भोसलेंनी माझ्या अंगावर माणसं घातली; पुण्यातील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंनी ठणकावून सांगितलं ;'लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं'; रुग्णालयाकडून क्लीनचिट, मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल ; 'जीवे मारण्याचा प्रयत्न?' लक्ष्मण हाकेंचा दावा, ससून रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा-ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ 

💫 महाविकास आघाडीचं ठरलं, दसऱ्याला जागावाटपाच मुहूर्त काढणार, तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्याचं 250 जागांवर एकमत झाल्याची सुत्रांची माहिती ; शरद पवारांना साथ, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, अनिल सावंत म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार 

 💫 उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस  ; लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार, म्हणाले काय असतो व्होट जिहाद ते सांगा? 

💫 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितच्या सिद्धार्थ मोकळेंचा खळबळनजक दावा ; उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस-उद्धव ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, त्यांची माहिती त्यांनी सार्वजनिक केली 

💫 अजित पवारांना दे धक्का; भोसरीचे माजी आमदार विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर मुलगा विक्रांत लांडेंनी केलं स्पष्ट ; थोरल्या पवारांचं बळ वाढणार; BRS ची प्रदेश शाखा 6 ऑक्टोबरला राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये विलीन होणार 

 💫 बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे, उदय कोतवाल यांना हायकोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला; बदलापूर प्रकरणातील बड्या माशांना वाचवलं जातंय, फरार संस्थाचालकांना पोलिस अटकही करत नाहीत; अक्षय शिंदेच्या वकिलांचा आरोप 

💫 दोन दिवस पावसाचा खेळ, एकही ओव्हर झाली नाही, तरीही टीम इंडियाने कसोटी जिंकली, 5 व्या दिवशी बांगलादेशला हरवलं ; कानपूर टेस्ट 5 कारणांमुळे क्रिकेटच्या इतिहासात अजरामर ठरणार; आक्रमक फलंदाजीसह रोहित शर्माची रणनीती 

💫महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून माघारी फिरणार 

💫 लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही निराश करणार नाही ; अजित दादांचा वादा 

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या