🌟बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा गटनेते उत्तमभैया खंदारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती🌟
पुर्णा :- पुर्णा येथील बुद्ध विहार या ठिकाणी दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 06.00 वाजता शहरामध्ये सार्वजनिक स्वरूपामध्ये धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन वर्षावास समारोप व अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांचा जन्मदिन संपन्न करण्यासंदर्भामध्ये पूर्णा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैया खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो परभणी येथील पूज्य भंते मुदितानंद थेरो पूज्य भदंत पयावंश ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे वीहार समितीचे सचिव एडवोकेट महेंद्र गायकवाड परभणी येथील एलआयसी चे सेवानिवृत्त अधिकारी तूपसुंदरआदींची उपस्थिती होती.
यावेळी अलिबाग येथून आलेले पूर्णा चे भूमिपुत्र भाई राजा रणवीर उद्योजक नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड शाहीर विजय सातोरे किशोर ढाकरगे बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे कृषी अधिकारी अनुरथ पुंडगे आदींनी मनोगत व्यक्त करून महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. भदंत डॉ. उपगुप्त महाथे रो यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन व वर्षावास समारोप कार्यक्रमाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजयराव बगाटे ज्येष्ठ धम्म उपासक अमृतराव मोरे टी झेड कांबळे वारा काळे गुरुजी शिवाजीराव थोरात सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव गायकवाड साहेबराव सोनवणे युवा कार्यकर्ते विशाल कांबळे राहुल धबाले आदींची उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोप मध्ये उत्तम भैया खंदारे यांनी वरील सर्व कार्यक्रम भव्य दिव्य प्रमाणामध्ये सार्वजनिक स्वरूपामध्ये साजरे करूया. अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले.
वाढदिवस विजयादशमी व वर्षावास पौर्णिमा या निमित्त झालेल्या बैठकीत गौतम काळे कैलास बलखंडे व महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती बैठकीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले आशीर्वाद गाथेने बैठकीचा समारोप झाला....
0 टिप्पण्या