🌟परळीत शरद पवारांनी धनंजय मुंडेंविरुद्ध राजेसाहेब देशमुख यांना तिकीट देऊन खेळले ओबीसी विरुद्ध मराठा कार्ड🌟
🌟बिड लोकसभे प्रमाणेच परळी विधानसभा मतदारसंघांतील ओबीसी विरुद्ध मराठा लढाई संपूर्ण महाराष्ट्रात गाजणार🌟
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने देखील उमेदवारांच्या दोन याद्या यापूर्वीच जाहीर केल्या असून आता तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या दोन यादीत राष्ट्रवादीने 67 उमेदवारांची घोषणा केली होती.आता तिसऱ्या यादीत 9 उमेदवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.
* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी :-
१. करंजा - ज्ञायक पटणी
2. हिंगणघाट - अतुल वांदिले
3. हिंगणा - रमेश बंग
4. अणुशक्तीनगर - फहाद अहमद
5. चिंचवड - राहुल कलाटे
6. भोसरी - अजित गव्हाणे
7. माझलगाव - मोहन बाजीराव जगताप
8. परळी - राजेसाहेब देशमुख
9. मोहोळ - सिद्धी रमेश कदम
* परळी विधानसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा :-
बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार नेमका कोण उमेदवार देणार याची उत्सुकता लागली होती. आता शरद पवारांनी या मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना राष्ट्रवादी पक्षात घेऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष होते. मात्र, काँग्रेसला खिंडार पाडत शरद पवारांनी त्यांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये करून घेतला आणि हा प्रवेश झाल्यानंतर त्यांना परळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. मुंडे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मुंडेंच्या विरोधात कोणता उमेदवार देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता अशातच शरद पवारांची मराठा उमेदवार मराठा कार्डाची ही खेळी या मतदारसंघात महत्त्वाची मानली जाते आहे.
* मविआतील पक्षांचे किती जागावर एकमत ?
विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवार 29 ऑक्टोबर पर्यंतच आहे. त्यामुळे, उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तयारी करण्यास वेळ मिळावा, कार्यकर्ते व पदाधिकारी यांची राजी, नाराजी व बंडखोरी टाळली जावी, म्हणून पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरेंच्या पक्षाने आत्तापर्यंत 80 उमेदवारांची घोषणा केली असून काँग्रेसनेही उमेदवारांच्या नावांच्या 3 याद्या जाहीर केल्या आहेत. तर शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने आज तिसरी यादी जाहीर करण्यात आली. एकूण 76 जणांना मैदानात उतरवण्यात आलेले आहे.
*अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला अनुशक्तीनगरमधून उमेदवारी :-
पक्षाने फहाद अहमद यांना अनुशक्तीनगर मधून उमेदवारी दिली. फहाद अहमद हे समाजवादी पक्षाचे पदाधिकारी होते. तसेच ते अभिनेत्री स्वरा भास्करचे पती आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना आपल्या चिन्हावरून उमेदवारी दिली आहे. आता अनुशक्ती नगरचा सामना हा राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा होणार आहे. या ठिकाणी नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक विरूद्ध फहाद अहमद अशी लढत होईल.......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या