🌟वाशिम जिल्ह्यातील 600 होमगार्डला मिळणार वाढीव भत्ता.....!


🌟महाराष्ट्र होमगार्ड मध्ये उत्साहाचे वातावरण🌟

फुलचंद भगत

वाशिम:-महाराष्ट्र होमगार्डच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय सोमवारी दि. 30 रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.या निर्णयाचा वाशिम जिल्ह्यामधील सहाशे होमगार्डला फायदा होणार आहे.

                 महाराष्ट्र पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे महाराष्ट्र होमगार्ड हे कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्याची मोलाची भूमिका बजावत असते, सण, उत्सव, मिरवणूक, निवडणूक ,असा अन्यवेळी बंदोबस्तासाठी होमगार्डची मदत घेतली जाते वाशिम जिल्ह्यात होमगार्डच्या एकूण सहाशे जागा मंजूर त्यापैकी 541 जागा भरलेल्या असून उर्वरित 59 रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे सध्या या होमगार्डला कर्तव्य भत्ता म्हणून दररोज 570 रुपये मिळतात आता या भात्यात वाढ करण्यात आली असून 1083 रुपये भत्ता मिळणारा आहे. 

याशिवाय उपाहार भत्ता  दोनशे रुपये कवायात भत्ता 180 रुपये खिसा भत्ता शंभर रुपये भोजन भत्ता 250 रुपये अशी जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ वाशिम जिल्ह्यामधील सहाशे होमगार्ड ला होणार आहे.

एक नजर आकडेवारीवर 

होमगार्ड एकूण जागा 

600

असा मिळेल भत्ता 

१) 1085 रुपये कर्तव्य भत्ता 

२) कवात भत्ता 180 रुपये 

३) भोजन भत्ता 250 रुपये 

४) उपहार भत्ता २०० रुपये 

यापूर्वी कर्तव्य भत्ता फार कमी होता आता महाराष्ट्र सरकारने जवळपास 515 ची वाढ केली असून 10८३ रुपये भत्ता मिळेल व इतरही भत्यात वाढ केली आहे.

- शेषराव खोडके,प्रभारी समादेशक मंगरूळपीर

होमगार्डच्या विविध प्रकारच्या भत्त्यात वाढ करावी अशी मागणी होती अखेर शासनाने भत्त्यात वाढ केली शासनाचा हा निर्णय अतिशय चांगला आहे कर्तव्य भत्यात जवळपास महाराष्ट्र सरकारने दुपटीने वाढ केली आहे . सरकारचे मनापासून आभार.

 - रशीद शेख,होमगार्ड मंगरूळपीर 

महाराष्ट्र होमगार्डच्या विविध भत्त्यामध्ये वाढ झाल्याने निश्चित याचा लाभ महाराष्ट्र होमगार्डला होईल, होमगार्डने कर्तव्य बजावल्यानंतर तातडीने भत्त्याची रक्कम मिळावी हीच आपेक्षा आहे व महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतला त्याचा जीआर लवकरात लवकर आचारसंहिता लागण्या अगोदर काढावा व महाराष्ट्र होमगार्डला नवीन भत्यानुसार वेतन अदा करावे अशी मागणी मंगरूळपीर येथील कंपनी कमांडर अमोल सुरोशे यांनी केली आहे. 

- अमोल सुरोशे,कंपनी कमांडर मंगरूळपीर

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र होमगार्ड बद्दल जो निर्णय घेतला वेतन वाढीचा त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन आमचे सरकारला एकच विनंती आहे की महाराष्ट्र होमगार्डला 365 दिवस काम देण्यात यावे अशी मागणी मंगरूळपीर पथकामधील होमगार्ड फिरोज भुरी वाले, नदीम हिरेवाले, जयपाल इंगळे, राजूभाऊ गजभार ,मोहम्मद तवकीर ,श्याम मिसाळ ,मयूर मनवर ,शितलदास उचित ,तानाजी शिंदे, किशोर भडांगे ,विनोद पारधी,  रहीम कालीवाले, रमजान पप्पू वाले, सोनू नातेकर, महबूब शेख, सागर इंगोले, गोपाल कोंगे,उस्मान पटेल यांनी केले आहे......

प्रतिनीधी :- फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या