🌟तर छाननी प्रक्रियेत 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत🌟
परभणी (दि.30 आक्टोंबर 2024) : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघा करीता 29 उमेदवारांनी 38 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 25 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर छाननी प्रक्रियेत 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. कदम विशाल विजयकुमार (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे), देशमुख रुपेश मनोहरराव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), मदनजी रेनगडे पाटील (न्यु राष्ट्रीय समाज पार्टी), माधव सोपानराव शिंदे (राष्ट्रीय मराठा पार्टी), रत्नाकर माणिकराव गुट्टे (राष्ट्रीय समाज पक्ष), विठ्ठल जीवनाजी रबदडे (जनहित लोकशाही पार्टी), सिताराम घनदाट (मामा) (वंचित बहुजन आघाडी), अलका विठ्ठल साखरे (अपक्ष), कदम संजय साहेबरराव (अपक्ष), कदम स्मिता संजय (अपक्ष), जलील गुलाब पटेल (अपक्ष), जोगदंड मुंजाजी नागोराव (अपक्ष),नामदेव रामचंद्र गायकवाड (अपक्ष), प्रविण गोविंदराव शिंदे (अपक्ष), बालासाहेब हरिभाऊ निरस (अपक्ष), भगवान ज्ञानोबा सानप (अपक्ष), भोसले विष्णुदास शिवाजी (अपक्ष), लक्ष्मण शंकरराव शिंदे (अपक्ष), विठ्ठल सोपान निरस (अपक्ष), विशाल बबनराव कदम (अपक्ष), विशाल बालाजीराव कदम (अपक्ष), शिरीन बेगम मोहम्मद शफिक (अपक्ष), शेख हबीब शेख रसूल (अपक्ष), अॅड. संजीव देवराव प्रधान (अपक्ष), श्रीकांत दिगांबर भोसले (अपक्ष) आदींचे अर्ज वैध ठरले आहेत. तर शिवराज प्रभाकर पैठणे (बहुजन समाज पार्टी), संग्राम केशवराव रेंगे (अपक्ष), विशाल बंडू कदम (अपक्ष), राजभोज राजकुमार बाबुराव (अपक्ष) यांचे अर्ज अवैध ठरले आहेत.......
0 टिप्पण्या