🌟परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज गुरुवार दि.24 आक्टोंबर रोजी 13 नामनिर्देशन पत्र दाखल.....!


🌟संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार🌟

परभणी (दि.24 आक्टोंबर 2024) :- आज गुरुवार, दि 24 ऑक्टोबर 2024 रोजी वितरण केलेले नामनिर्देशन पत्र व उमेदवारांनी दाखल केलेले नामनिर्देशन पत्राची माहिती मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे :-

जिंतूर विधानसभा मतदारसंघ – 38 उमेदवारांनी  66 अर्ज घेतले. तर विजय माणिकराव भांबळे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) यांनी 2 नामनिर्देशन पत्र, कृष्णा त्रिंबकराव पवार यांनी ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टीच्यावतीने एक व अपक्ष म्हणून एक नामनिर्देशन पत्र आणि सुखदेव उध्दव भांबळे (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. 

परभणी  विधानसभा  मतदारसंघ - 11 उमेदवारांनी  22 अर्ज घेतले. तर ॲड अफजल बेग (अपक्ष), विजय अंबादासराव वरपुडकर यांनी भारतीय जनता पार्टीच्यावतीने एक व अपक्ष म्हणून एक नामनिर्देशन पत्र दाखल केले. 

गंगाखेड विधानसभा मतदारसंघ - 15 उमेदवारांनी 25 अर्ज घेतले. तर रत्नाकर माणिकराव  गुट्टे (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. 

पाथरी विधानसभा मतदारसंघ - 14 उमेदवारांनी 32 अर्ज घेतले. तर चंद्रसिंग एकनाथ नाईक (अपक्ष), निर्मला उत्तमराव गवळी (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), राजेश उत्तमराव विटेकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी),राजेश बालासाहेब पाटील (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

(संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*-*-*-*-*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या