🌟विधानसभेसाठी 23 ऑक्टोबर रोजी 9 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र केले दाखल🌟
परभणी (दि.23 आक्टोंबर 2024) :- आज बुधवार, दि 23 ऑक्टोबर 2024 रोजी वितरण केलेले नामनिर्देशन पत्र व उमेदवारांनी दाखल केलेले नामनिर्देशन पत्राची माहिती मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे :-
95- जिंतूर विधानसभा मतदारसंघ - 6 उमेदवारांनी 6 अर्ज घेतले. तर ज्ञानेश्वर देविदास राठोड (अपक्ष), ज्ञानेश्वर नुरा राठोड (अपक्ष), अच्युत लिंबाजी कदम (अपक्ष), विजय अण्णासाहेब ठोंबरे (अपक्ष), मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर (भारतीय जनता पार्टी), विनोद दत्तात्रय भवाळे (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
96- परभणी विधानसभा मतदारसंघ - 25 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले.
97- गंगाखेड विधानसभा मतदारसंघ - 32 उमेदवारांनी 50 अर्ज घेतले. तर रत्नाकर माणिकराव गुट्टे (राष्ट्रीय समाज पक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
98- पाथरी विधानसभा मतदारसंघ - 20 उमेदवारांनी 48 अर्ज घेतले तर भास्कर रामकिसन बेदरे (अपक्ष) व त्रिंबक देविदास पवार (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
(संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*-*-*-*-*
0 टिप्पण्या