🌟विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 : परभणी विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न....!


🌟नियुक्त कर्मचाऱ्यांची बैठक आज मंगळवार दि.01 आक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली🌟

परभणी (दि.01 आक्टोंबर 2024) : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 96- परभणी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत निवडणूक विषयक विविध कामे पार पाडण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची  बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी  जनार्धन विधाते, निवडणूक निर्णय अधिकारी (विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, 96- परभणी विधानसभा मतदारसंघ) तथा उपविभागीय अधिकारी, परभणी दत्तु शेवाळे, महानगरपालिका अपर आयुक्त मिनीनाथ दंडवते, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार परभणी डॉ. संदीप राजपुरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सामान्य प्रशांत वाकोडकर, गट विकास अधिकारी दिपा बापट, नायब तह‌सिलदार अनिकेत पालेपवाड, नायब तहसिलदार मधुकर क्षिरसागर, अनिता वडवळकर व विविध कक्षाचे नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी/कर्मचारी यांना नेमुण दिलेल्या कामाबाबत यथोचित मार्गदर्शन डॉ. प्रताप काळे, जनार्धन विधाते, दत्तु शेवाळे, डॉ. श्री. संदीप राजपुरे यांनी केले.....

*-*-*-*-*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या