🌟या यशा बद्दल विनोद रमेश बुलंगे यांचा अकॅडमी तर्फे करण्यात आला सत्कार🌟
पुर्णा :- पुर्णा येथील मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीचा विद्यार्थी विनोद रमेश बुलंगे हा भारतीय थलसेना अग्निवीर GD मध्ये सलेक्ट झाला असून 19 आक्टोम्बर रोजी बेंगलोर येथे प्रशिक्षण केंद्रात त्याची ट्रेनिंगला सुरुवात होणार आहे. तो राहणार चांगेफळ ता पूर्णा येथील रहिवाशी असून वयाच्या 18 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला आहे. या यशा बद्दल त्याचे अकॅडमी तर्फे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री.जगदीश जोगदंड दैनिक सकाळ प्रतिनिधी पूर्णा हें होते तर मुख्य अतिथी म्हणून रेल्वे विभागातील मैदानी स्पर्धेतील राष्ट्रीय खेळाडू मा.श्री. शुक्लोधन मन्याळीकर हें होते या दोघांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्याचा शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख उपस्तिथ प्रा. ज्ञानेश्वर बोकारे संचालक स्वराज अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पूर्णा, मा. श्री. विलास चव्हाण मैदानी प्रशिक्षक आदी उपस्तिथ होते. मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे महाराष्ट्र पोलीस भर्ती,आर्मी भर्ती , रेल्वे पोलीस भर्ती, आदी वेगवेगळ्या भरतीचे फिजिकल मैदानी तयारी करून घेण्यात येते तर लेखी परीक्षेची तयारी स्वराज अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पूर्णा मार्फत केली जाते. गेल्या चार महिन्यात अकॅडमीचे तीन विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले असून नवीन बॅच एक तारखे पासून सुरु झाली आहे अशी माहिती मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक प्रा. डॉ. महेश जाधव यांनी दिली आहे.....
0 टिप्पण्या