🌟काँग्रेस पक्षाची 14 विधानसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर.....!


🌟संभाजीनगर व मुंबईतील पुर्वी घोषित उमेदवारांना धक्का देत त्या ठिकाणी लहु शेवाळे व अशोक जाधव यांना उमेदवारी🌟

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने चौथी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने १४ उमेदवार जाहीर केले आहेत. चौथ्या यादीत विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत मात्र मुंबई सोबतच औरंगाबाद पुर्वच्या जागेवर ट्विस्ट पाहायला मिळत आहे. येथे उमेदवारांचा फेरबदल झाला आहे. अंधेरी पश्चिममधून सचिन सावंतांच्या जागेवर अशोक जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर औरंगाबार पूर्व येथून मधुकर देशमुखांच्या जागेवर लहू शेवाळे यांना संधी देण्यात आली आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचाही तिढा सुटला असून दिलीप मानेंची उमेदवारी निश्चित झाली आहे.

* काँग्रेसच्या चौथ्या यादीतील नावे :-

अमळनेर - अनिल शिंदे

उमरेड (अजा) - संजय मेश्राम

अरमोरी (अज)- रामदास मसराम

चंद्रपूर(अजा) - प्रवीण पडवेकर

बल्लारपूर - संतोष सिंग रावत

वरोरा - प्रवीण काकडे

नांदेड उत्तर - अब्दुल सत्तार गफुर

औरंगाबार पूर्व - लहू शेवाळे (मधुकर देशमुखांच्या बदल्यात)

नालासोपारा - संदीप पांडे

अंधेरी पश्चिम - अशोक जाधव (सचिन सावंतांच्या बदल्यात)

शिवाजी नगर - दत्तात्रय बहिरत

पुणे कँटोन्टेनमेंट (अजा) - रमेश भागवे

सोलापूर दक्षिण - दिलीप माने

पंढरपूर - भागिरथ भालके 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या