🌟अ.भा.भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो भदंत पैय्या वंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रमांचे आयोजन🌟
अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो भदंत पैय्या वंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सार्वजनिक स्वरूपामध्ये पूर्णा शहरामध्ये धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दिनांक 12 ऑक्टोबर 2024 सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण निरंजना महिला मंडळाचे अध्यक्षा कासाबाई कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी दहा वाजता बुद्ध विहार पूर्ण या ठिकाणी नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
बुद्ध विहार 12 ऑक्टोबर दुपारी बारा वाजता बुद्ध विहारात सामुहिक त्रिरत्न वंदना पूजनीय भिख्खू संघाच्या उपस्थिती मध्ये ग्रहण करून सजविलेल्या रथामधून तथागत भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मूर्तीची भव्य रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून दुपारी बारा वाजता बुद्ध विहारात सामूहिक बुद्ध वंदना पूजा विधि संपन्न झाल्यानंतर भव्य मिरवणूक तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषंमध्ये मिरवणूक काढण्यात येणार आहे. सदरील मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विसर्जित करण्यात येऊन या ठिकाणी जाहीर धम्म सभा होणार आहे सेवानिवृत्त शिक्षक ज्येष्ठ धम्म उपासक वामनराव राजाराम काळे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख धम्मदेशना भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिकू संघ व भदंत पायावांश यांची असणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध विचारवंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे भाष्य कार प्रो. डॉ. राजेंद्र गोणारकर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हे आहेत सदरील प्रबोधनात्मक कार्यक्रमाला उपस्थित रहावे तसेच धम्मकार्यात सहभागी व्हावे असे आवाहन बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व विविध धम्म सेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमात सहभागी होताना सर्व उपासक-उपासिकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करावे व कार्यक्रम तसेच मिरवणुकीत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो व भंते प यावंश यांनी केले आहे.......
0 टिप्पण्या