🌟परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील बोरीत शुक्रवार दि.04 आक्टोंबर रोजी सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन....!


 🌟तालुक्यातील नागरिकांनी शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार मेघनाताई बोर्डीकर यांनी केले आहे🌟 

परभणी (दि.02 आक्टोंबर 2024) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सामुदायिक आरोग्य शिबिरांचे जिल्ह्यात आयोजन करण्यात येत आहे याचाच भाग म्हणून शुक्रवार दि.04 आक्टोंबर रोजी परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे सामुदायिक आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून शिबिराचा महिला व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी केले आहे.


             जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात दि.04 ऑक्टोबर रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती आ.मेघनाताई बोर्डीकर यांनी आज बुधवार दि.02 आक्टोंबर रोजी बोरी येथे आयोजित केलेल्या लाडकी बहीण संवाद कार्यक्रमात दिली. या शिबिरात आरोग्य तपासणी, मोफत औषधी, शस्त्रक्रिया, रक्त तपासणी, रक्तदाब, बालरोग, कॅन्सर, स्त्रीरोग, अस्थिरोग, मधुमेह आदी आजारांची तपासणी व उपचार करण्यात येणार असल्याने बोरी व परिसरातील महिला व नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांंनी केले. दरम्यान, या कार्यक्रमात बोरी व परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या