🌟महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟जळगाव जामोद मध्ये खासगी शिकवणी वर्गात शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार🌟

💫 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या  कार्यालयाबाहेर एका महिलेने केली तोडफोड ; तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली...धनश्री सहस्रबुद्धेच्या घरी पोलिसांची टीम दाखल.. महिला मनोरुग्ण असल्याची माहिती.

💫 एखादी बहीण उद्विग्न झाली असेल तर कारण समजून घेऊ, व्यथा दूर करू, कुणी जाणीवपूर्वक केलं असेल तर ते ही समजून घेऊ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोडफोडीवर प्रतिक्रिया.

💫 मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी बाजी मारली ; मिळवला मोठा विजय ; अभाविपचा उडविला धुव्वा ; मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकीत युवासेनेची बाजी...10 पैकी 10 उमेदवार विजयी.

💫 केंद्रीय निवडणूक आयोग मुख्य सचिवांवर नाराज...तीनवेळा पत्र पाठवूनही निवडणुकपूर्व बदल्यांचा अहवाल न दिल्यानं संताप... स्पष्टीकरण देण्याचे निर्देश.

💫 पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्याची,काँग्रेस शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी.. तर शिंदे गटाकडून निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची मागणी...

💫 "धर्मवीर तीनची पटकथा मी लिहिणार" उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान..त्यांनी औरंगजेबावर चित्रपट काढावा, संजय राऊतांची टीका..तर संजय राऊतांवर दलाल नंबर एक चित्रपट यावा, संजय शिरसाटांची टीका.

💫 काँग्रेसच्या काळातल्या अपूर्ण प्रकल्पांचा पंचनामा भाजपच्या जाहीरनाम्यातून करण्यात येणार 

💫 अजिदादांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर..राजन पाटलांची सहकार परिषदेवर नियुक्ती, तर नाराज उमेश पाटील राजीनामा देण्याच्या तयारी.

💫 मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पहिला राजकीय बळी शरद पवार ठरणार.. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.. तिसऱ्या आघाडीसोबत जाणार नसल्याचंही केलं स्पष्ट... 

💫 अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी जमीन उपलब्ध करुन देऊ,राज्य सरकारची हायकोर्टात हमी,तीन शहरांमध्ये झालाय अंत्यसंस्काराला विरोध.

💫 नाशिकच्या कपालेश्वर मंदिरातील वाद सुरू असलेल्या पाचही दानपेट्या सील, नाशिक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल, पंचवटी पोलिसांच्या उपस्थितीत मंदिरातील पाचही दानपेट्या सील.

💫 मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज पुरंदर बंदची हाक, बंदला नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद, मराठा बांधवांकडून 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा.

💫 नागपूरमध्ये गोंड गोवारी संवैधानिक हक्क कृती समितीचा मोर्चा,गोंड गोवारी जमातीला आदिवासींचं आरक्षण पुन्हा बहाल करण्याची मागणी.     

💫 पुण्याच्या इंदापूरमध्ये 80 वर्षाच्या वृद्धाकडून 26  वर्षाच्या मतीमंद मुलीवर बलात्कार, आरोपीला वालचंदनगर पोलिसांकडून अटक.  

💫 खासगी शिकवणी वर्गात अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, शिक्षकानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार, जळगाव जामोद पोलिसांनी पोक्सोचा गुन्हा दाखलकरून आरोपी किशोर पाटीलला केली अटक. 

💫 मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात पतीकडून पत्नीवर असिड हल्ला पतीचे दुसऱ्या महिलेबरोबर विवाहबाह्य संबंध पत्नीने घटस्फोटाची मागणी केल्यानंतर ॲसिड हल्ला केल्याची माहिती, आरोपी पतीला अटक.

💫 साताऱ्यातील सज्जनगड - ठोसेघर रोडवरील बोर्णे घाटात कार दरीत कोसळली, कारमध्ये 4 जण असल्याची माहिती, एका महिलेची सुटका, इतरांचा शोध सुरू. 

💫 बीड-परळी महामार्गावर  बुलेटस्वाराची पाच दुचाकींसह एका ॲपे रिक्षाला धडक, याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू.                            

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या