🌟अडाण नदीच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह शोधण्यात पिंजर येथील रेस्क्यु टीमला अखेर यश.....!


🌟घटनास्थळावरुन एक किलोमिटर अंतरावर दुपारी एक वाजता मृतदेह शोधून काढण्यात भरीव यश मिळाले🌟


फुलचंद भगत

वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील पुरावरुन एका व्यक्तीने ऊडी मारली त्यानंतर तो पुराच्या पाण्यात वाहुन गेला.दोन दिवस सदर व्यक्तीचा शोध घेतल्यानंतर शेवटी शेलुबाजार येथील मोठ्या पुलाच्या जवळ मृतदेह शोधन्यास मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन पथकास यश आले आहे.

              शेलुबाजार येथील व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहुन गेल्यानंतर मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी दोन दीवस सर्च ऑपरेशन राबवले. रात्रीच्या वेळीही शोधमोहिम राबवली पण काहीच न मिळुन आल्याने त्यात पाणी वाढतच असल्याने नदीला ठिकठिकाणी बंधारे आणी धारांची खळखळाट अन त्यात लाकडे फुरसांड असल्याने मोठी डोकेदुखी वाढली होती याही अडचणींवर मात करून दिनांक 4 सप्टेंबर ला तिव्र शोध मोहीम चालु केली असता घटनास्थळावरुन एक कीलोमिटर अंतरावर दुपारी एक वाजता मृतदेह शोधून काढण्यात भरीव यश मिळाले आहे.जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस तसेच निवासी जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या आदेशाने सर्च ऑपरेशनचा आज तीसरा दीवस होता.दि.२ सप्टेंबर रोजी दुपारी वाशिम जिल्ह्य़ातील मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील रहीवाशी सागर ऊर्फ गोलु अरुण प्रधान हा युवक गावातुनच वाहणा-या  अडाण नदिला आलेल्या पुरात वाहून गेल्याची माहीती मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे  प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले होते लगेचच दिपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयूर सळेदार, अंकुश सदाफळे,विष्णु केवट,शेखर केवट,अश्विन केवट,महेश वानखडे,अतुल उमाळे,गोपाल गीरे,अपूर्व चेके,शुभम भोपळे,दत्ता मानेकर,राम भोपळे,सागर डाके,रोशण झामरे,ओम गोरवे,मयुर कळसकार, धिरज राऊत,सुरज ठाकुर,

निलेश खंडारे,विकास सदांशिव,निखील बोबडे, गोलु वाळके,ओम वानखडे,अमर ठाकूर यांचेसह शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी रवाना झाले होते आणी अंडर वाॅटर सर्च ऑपरेशन चालु केले असता काहीच मिळुन आले नव्हते शेवटी ४ सप्टेबर रोजी जिवरक्षक दिपक सदाफळे यांचेसह यांच्या टीम ने मोठ्या साहसाने जिद्द कसोसीने कल्पकतेने शेवटी मृतदेह शोधून काढला.यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव,तहसीलदार शितल बंडगर,नायब तहसिलदार रवी राठोड,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत,तलाठी,गावंडे,तलाठी दिनेश राऊत,पांडे, हे हजर होते.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या