🌟महामानव तथागत भगवान बुद्धांनी दिलेला आर्य अष्टांगिक मार्ग मानव जातीला शाश्वत सुखाकडे नेणारा आहे...!


🌟आपल्या प्रदीर्घ अभ्यासपूर्ण धम्मदेशनेमध्ये भदंत रत्नदीप थेरो यांनी बुद्ध धम्मतत्त्वज्ञानाचे महती विशद करताना सांगितले🌟


पुर्णा :- अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो पूज्य भदंत पैया वंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी भाद्रपद  पौर्णिमेनिमित्त करण्यात आले होते सकाळी साडेपाच वाजता बुद्ध विहारांमध्ये परित्राण पाठ व रत्न वंदना पूजनीय भिकू संघाच्या उपस्थितीमध्ये ग्रहण करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने धम्म उपासिका व उपासक हजर होते.दुपारी साडेबारा वाजता धम्मोदय युट्युब चॅनेल छत्रपती संभाजी नगर येथील पूज्य भदंत रत्नदीप थेरो पूज्य भदंत नागसेन छत्रपती संभाजीनगर पूज्य भदंत पया वंश यांची धम्मदेशना त्याचप्रमाणे अधीक्षक अभियंता परभणी येथील रुपेश टेम्भूर्णे व पूर्णा येथील उपकार्यकारी अभियंता मंगेश खरगे यांचा विहार समितीच्या वतीने  सत्कार करण्यात आला.


आपल्या प्रदीर्घ अभ्यासपूर्ण धम्मदेशनेमध्ये भदंत रत्नदीप थेरो यांनी बुद्ध धम्मतत्त्वज्ञानाचे महती विशद करताना सांगितले महामानव तथागत भगवान बुद्धांनी दिलेला आर्य अष्टांगिक मार्ग जगामधील मानव जातीसाठी प्राणीमात्रासाठी शाश्वत सुखाकडे नेणारा आहे.बौद्धकालीन अनेक उदाहरणे देऊन बुद्ध तत्त्वज्ञान विचार प्रणाली यामधून प्रत्येकाला आपला उत्कर्ष साधता येतो असे त्यांनी सांगितले भदंत नागसेन यांनी कुशल कर्म दान परमिता याविषयी सोदाहरण माहिती दिली.भदंत पयावंश यांनी पूज्य भंतेगणांचा परिचय करून दिला व आषाढ पौर्णिमेचे महत्त्व विशद केले.

 यावेळी प्रमुख उपस्थिती सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत प्रकाश कांबळे  ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैया खंदारे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष  जोगदंड  जेस्ट पत्रकार विजयराव बगाटे उद्योजक गौतम भोळे  सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव गायकवाड प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळे सेवानिवृत्त लोको पायलट  विजय  जोंधळे साहेबराव सोनवणे  इंजिनीयर पी.जी. रणवीर टी. झेड.कांबळे अमृत मोरे मुगाजी खंदारे बौद्धाचार्य तुकाराम ढगे  ज्ञानोबा जोंधळे शिवाजी थोरात हिरामण जोंधळे गौतम वाघमारे बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे  अतुल गवळी किशोर ढाकरगे आदींची उपस्थिती होती. उपस्थितांना खीरदान उपासिका गंगासागर अशोक पाटील व उपासिका संगीता सिताराम नगारे यांनी केले. उपासिका मंगल ताई राजू सवणे पुणे यांच्याकडून बुद्ध विहारास एसीचे दान  करण्यात आले.

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम भालेराव राहुल धबाले बाळू बरबडीकर राजू जोंधळे सुरज जोंधळे सोनू काळे व बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा व धम्म सेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे मा. तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या