🌟पुर्णेतील रस्त्यांवर खड्डे की कोट्यावधी रुपयांच्या विकासनिधी नंतर देखील अक्षरशः खड्ड्यात पुर्णा ?


🌟शहरातील नागरिकांना पडला प्रश्न : गणेशोत्सव काळात देखील अबालवृद्ध महिला नागरीकांचा खड्ड्यातून प्रवास🌟


 
पुर्णा (विशेष वृत्त) :- पुर्णा नगर परिषद प्रशासनाची अजब गजब तऱ्हा कोट्यावधी रुपयांचा शासकीय विकासनिधी निर्मनुष्य वसाहतींमध्ये रस्ते/नाल्यांच्या बांधकामावर कागदोपत्री उधळला भराभरा शहरातील प्रमुख सार्वजनिक रस्त्यांवर मात्र मोठमोठी खड्डे अन् खड्ड्यात साचतेय अस्वच्छ पाणी आणि चिखलगारा ? एकंदर अशी अवस्था शहरात सर्वत्र झाल्याचे पाहावयास मिळत असून पुर्णा शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर मोठमोठी खड्डे की खड्ड्यात पुर्णा ? असा प्रश्न आता शहरवासीयांमध्ये उपस्थित होत असून नुकतीच सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून गणेशोत्सव काळात तरी नगर परिषद प्रशासनाला जनाची नाही मनाची तरी लाज वाटेल व नगर परिषद प्रशासन सार्वजनिक रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सुरुवात करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु अक्षरशः धृतराष्ट्री आवेशात 'आंधळं दळतंय अन् कुत्र पिठ खातयं' असा अनागोंदी कारभार चालवणाऱ्या मुख्याधिकारी युवराज पौळ यांना नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदन देऊन सार्वजनिक रस्त्यांवर पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्याच्या दिशेने पाऊल उचलण्याची मागणी केल्यानंतर आज पुर्णा नगर परिषद नगर अभियंता यांनी डोळ्यात तेल ओतून शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केल्याचे समजते.

दरम्यान शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात काल रविवार दि.०९ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिक रस्त्यावरील खड्डे वाचवत प्रवास करतांना एक लोडींग ॲटो पलटी झाल्याची दुर्दैवी घटना घडली सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवित हाणी झाली नसली तरी या अपघाताने पुर्णा नगर परिषदेचे अकार्यक्षम मुख्याधिकारी पौळ यांना भविष्यात घडणाऱ्या गंभीर घटनांचे संकेत मात्र दिले असे म्हणणे यत्किंचितही चुकीचे ठरणार नाही पुर्णा नगर परिषद प्रशासनाला शहरातील सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनासह केंद्र शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा शासकीय विकासनिधी प्राप्त झाला असला तरी सदरील कोट्यावधी रुपयांच्या विकासनिधीचा वापर नगर परिषद प्रशासनाने निर्मनुष्य नुतन वसाहतींच्या विकासावर उधळत आवश्यक नसलेल्या ठिकाणी मोठमोठ्या नाल्यांच्या व निकृष्ट रस्ता बांधकामावर तसेच आवश्यकता नसलेल्या ठिकाणी सार्वजनिक उद्यानावर निर्मनुष्य वसाहतीमध्ये स्ट्रिट लाईट अर्थात पथदिव्यांवर तेही विदाऊट लाईट खांबांवर अनाठायी खर्च करुन शासकीय विकासनिधीची प्रचंड प्रमाणात उधळण करीत शहरातील सार्वजनिक रस्त्यांची दुरवस्था करीत पुर्णा शहरातील नागरिकांना सार्वजनिक रस्त्यांवरील खड्ड्यातून जिवघेणा प्रवास करण्यास मजबूर केल्याने नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या