🌟श्री गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सनांच्या पार्श्वभूमीवर पुर्णा पोलीस प्रशासनाने केले होते शांतता समिती बैठकीचे आयोजन🌟
परभणी/पुर्णा :- परभणी जिल्ह्याचे कर्तव्यकठोर अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुर्णा पोलिस स्थानकात श्री गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सनांच्या पार्श्वभूमीवर दि.०५ सप्टेंबर २०२४ रोजी पुर्णा पोलिस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास गोबाळे यांच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
आगामी दहा दिवस चालणारा श्री गणेशोत्सव तसेच मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद हे सन शांततेत पार पडावे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिकोनातून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष/कर्तव्यकठोर अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या अध्यक्षते खाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली बैठकीत अनेक मान्यवरांनी आपल्या सुचना देखील मांडल्या यावेळी शांतता समिती बैठकीत उपस्थित मान्यवरांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले या बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील,नायब तहसीलदार प्रशांत थारकर,नगर परिषदेचे कर्मचारी गणेश रापतवार, महावितरणचे अधिकारी वसमतकर,जामा मस्जिदचे पेश ईमाम मौलाना शमीम अहमद रिझवी साहब,माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम होते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांनी केले यावेळी पोलीस निरीक्षक विलास गोबाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना असे नमूद केले की प्रत्येक नागरिकाने सर्वधर्म समभावाची भावना जोपासली पाहिजे या वेळी रिपाई चे नेते प्रकाशदादा कांबळे,पत्रकार विजय बगाटे,सुभाष ओझा,मुजीब कुरेशी,मोहम्मद शफिक,शेख अमीन सर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती या बैठकी साठी तालुक्यातील पोलीस पाटील, मंडळाच्या पदाधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, नगरसेवक, पत्रकार, शांतता समितीचे सर्व सदस्य यांनी उपस्थिती दर्शवली होती सूत्रसंचालन पत्रकार जगदीश जोगदंड यांनी केले आभार सहाय्यक पोलिस निरीक्षक रामकिशन नांदगावकर यांनी मानले......
0 टिप्पण्या