🌟राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश सचिव स.मनबीरसिंघ ग्रंथी यांनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन🌟
नांदेड (दि.06 सप्टेंबर 2024) :- नांदेड शहरातील गोदावरी नदीवरील तिन्ही पुलांवर दोन्ही बाजूने लोखंडी जाळी बसवाव्यात, अशी मागणी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश सचिव तथा गंगाखेड विधानसभेचे पक्ष निरीक्षक सरदार मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
नांदेड शहरामध्ये अनेक वर्षापासून आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून शहरातील गोवर्धनघाट पूल, जुना मोंढा पूल, देगलूर नाका जुना पुलावरुन उडी मारुन आपला जीव संपविण्याचे (आत्महत्यचे) प्रमाणे वाढले आहे. त्यामुळे या तिन्ही पुलांवर संरक्षक कवच म्हणून दोन्ही बाजूने लोखंडी जाळी बसवून देण्यात यावी, कारण हा उपाय केल्यामुळे आत्महत्यांचे प्रमाणात कमी होईल. तसेच पुलावरुन जे घाण, कचरा गोदावरी नदीमध्ये टाकत आहेत, ही पवित्र नदी असल्यामुळे देश-विदेशातून लाखो भाविक नांदेड येथे येतात. तसेच गोदावरीमध्ये स्नान करण्यासाठी या दुर्गंधीमुळे खूप त्रास होत आहे.
तरी लवकरात लवकर लोखंडी जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश सचिव तथा गंगाखेड विधानसभेचे पक्ष निरीक्षक सरदार मनबीरसिंघ ग्रंथी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जसबीरसिंघ बुंगई यांची उपस्थिती होती.......
0 टिप्पण्या