🌟जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर जलाशयातून तून पाण्याचा विसर्ग सुरू....!


🌟त्यामुळे गोदावरी नदी काठावरील गावांना जिल्हा महसूल प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा🌟 

परभणी : जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर जलाशयातून  गोदावरी नदीच्या पात्रात रात्री बारा वाजल्यापासून चार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.त्यामुळे गोदावरी नदी काठावरील गावांना जिल्हा महसूल प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे आज दि. 25 सप्टेंबर रोजी रात्री ठिक 12.00 वाजता जायकवाडी प्रकल्प (नाथसागर जलाशय) 99.62 टक्के क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक व उर्ध्व भागातील धरणांमधुन येणारी आवक बघता आज 25 सप्टेंबर रोजी रात्री ठिक 00.45 वा. ते 1:00 वा. दरम्यान जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात 2096 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत एकूण 4 दरवाजे प्रत्येकी 0.5 फुटाने उघडण्यात आले असुन या प्रकल्पातून एकूण पाण्याचा  2096 क्यूसेस विसर्ग होणार आहे.धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल,असे पाटबंधारे खात्याने नमूद केले आहे. कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये या करिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी.गावांनी सतर्क रहावे. असे आवाहन पाटबंधारे खात्याने व परभणी जिल्हा महसूल प्रशासनाने ही केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या