🌟परभणी जिल्ह्यातील लोककला नाट्यक्षेत्रात गेल्या उल्लेखनीय योगदान : संजय पांडेंचा चित्रपट कामगार आघाडीतर्फे गौरव...!


🌟भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या चित्रपट कामगार आघाडीकडून करण्यात आला संजय पांडेंचा गौरव🌟

परभणी (दि.०५ सप्टेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील लोककला आणि नाट्यक्षेत्रात मागील २५ वर्षांपासून उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल संजय पांडे यांचा भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या चित्रपट कामगार आघाडीतर्फे गौरव करण्यात आला.

                छत्रपती संभाजी नगरातील एमजेएम विद्यापीठातील रुक्मिणी सभागृहात गुरुवार ०५ सप्टेंबर रोजी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात जय मल्हार मालिकेतील म्हाळसा फेम सुरभी हांडे, ज्येष्ठ अभिनेत्री निलम शिर्के यांच्याहस्ते व भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुंडे, चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीर दिक्षीत, उपाध्यक्ष सचिन अनर्थे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पांडे यांचा गौरव करण्यात आला.

               श्री. पांडे यांनी गेल्या २५ वर्षात परभणी जिल्ह्यातील लोककलावंत, नाट्य कलावंत यांना कला सादरीकरणाकरीता विविध व्यासपीठ मिळवून देण्यासह ग्रामीण भागातील ०१ हजारांवर ज्येष्ठ लोककलावंत व नाट्यकलावंतांची शासनाच्या मानधन योजनेचा लाभ मिळवून देत मोठे योगदान दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या चित्रपट कामगार मोर्चाच्या वतीने गौरविण्यात आले.

             दरम्यान, या कार्यक्रमास नाट्य अभिनेते प्रकाश बारबिंड, रामदास कदम यांच्यासह अन्य कलावंत उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या