🌟पुर्णा तालुका क्रिडा संकुलात शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न....!


🌟या बुद्धिबळ स्पर्धेत विद्या प्रसारिणी सभेच्या हायस्कूल मधील खेळाडूंनी दणदणीत विजय संपादन केला🌟

पुर्णा :- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णा तालुका क्रीडा संकुल येथे शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत विद्या प्रसारिणी सभेचे हायस्कूल मधील खेळाडूंनी विजय संपादन केला. विजय खेळाडूची परभणी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या बुद्धिबळ स्पर्धेतील विजयी खेळाडू पुढीलप्रमाणे : चौदा वर्ष वयोगटातील विजयी मुले अनिकेत अरविंद कदम,रुद्र अमोल स्वामी,साहिल संतोष निगडकर,प्रणव विजय धुमाळे चौदा वर्ष वयोगटातील विजयी मुली शौर्या अमृतराज कदम,क्षितिजा प्रदीप कापसे,अक्सा अब्दुल जावीद कुरेशी,अफिरा फातिमा असद शेख  सतरा वर्ष वयोगटातील विजयी मुले गजानन राजू कदम,मंगेश गणेश पांचाळ,शेख युसुफ असद शेख,सतरा वर्ष वयोगटातील विजयी मुली निशिगंधा ईश्वर स्वामी,प्रणिता रामू नारायणकर आदींनी दणदणीत विजय संपादन केला असून या विजय खेळाडूचे संस्था अध्यक्ष  डॉ.  दत्तात्रेयजी वाघमारे, सचिव विजयकुमार रुद्रवार, उपाध्यक्ष भीमरावजी कदम,  श्रीनिवासजी काबरा, उत्तमरावजी कदम, साहेबरावजी कदम, मुख्याध्यापक देविदास उमाटे व शिवदर्शन हिंगणे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजय खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे  व सज्जन जयस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या