🌟मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस,प्रकृती प्रचंड खालावली,अंतरवाली सराटीत महिलांनी फोडला टाहो🌟
💫 अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे, नवी मुंबईचे सीआयडी अधीक्षक करणार तपास ; अक्षय शिंदेच्या तोंडावर बुरखा अन् हातही बांधलेले, मग त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला ; संजय राऊतांच्या पोस्टने सस्पेन्स वाढला
💫 बदलापूर अत्याचाराला शाळा जबाबदार, त्यांनी पैसे देऊन अक्षयला ठार मारलं; पालकांचा आरोप ; अक्षय शिंदेला मारण्यापूर्वी पोलिसांनीच त्याचा खिशात एक कागद ठेवला, अक्षयच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप ; सर्वोच्च न्यायालयाच्या मते एन्काऊंटर हा खून, बदलापूर प्रकरणी अॅड. असीम सरोदेंची हायकोर्टात याचिका
💫 बदलापूरच्या शाळेतील ट्र्स्टींवर मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीचा आरोप, घटनेच्या दुसऱ्याच दिवशी आणखी एक गायब झाली होती, मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेतून आरोप ; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर बदलापूरच्या शाळेचे संस्थाचालक उदय कोतवाल आणि तुषार आपटेंची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव
💫 अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर 'देवाचान्याय' ट्रेडिंग, सोशल मीडियावर जोरदार समर्थन ; अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकलं, पण एन्काऊंटर विरोधकांचा झाला, आशिष शेलारांची विरोधकांवर टीक
💫 भाजप महाराष्ट्रात सामूहिक नेतृत्वामध्ये निवडणूक लढवण्याच्या तयारीत, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे नेतृत्व करण्याची शक्यता, कार्यकर्त्यांना वाटप करण्यात आलेल्या पत्रकात उल्लेख ; गटबाजी मुळीच खपवून घेतली जाणार नाही, नागपूर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम
💫 मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रकृती प्रचंड खालावली, अंतरवाली सराटीत महिलांनी फोडला टाहो ; परभणीतून अंतरवालीत जाणाऱ्या मराठा बांधवांना जालन्यातील वडीगोद्री गावातून प्रवेश नाकारला, मराठा आंदोलक रस्त्यावर, मोठ्या तणावानंतर पोलिसांचा हस्तक्षेप
💫 मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील लाडूंच्या पाकिटावर उंदराने पिल्लं जन्माला घातली, व्हिडिओ व्हायरल ; सदरचा व्हिडीओ हा या मंदिरातील नाहीच, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळले
💫 सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा नवा पुतळा उभारणार, 60 फूट उंच पुतळ्यासाठी 20 कोटीची निविदा जाहीर
💫 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर, 1 डिसेंबरला होणार परीक्षा, कृषी सेवेच्या 258 पदांचा पदांचा समावेश
💫 राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार, पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता ; पुण्यात दुपारीच मुसळधारा, कोकण, मराठ्यातही पावसाचा जोर; फळबाग अन् पिकांचं नुकसान
💫 अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव...पुरावे नष्ट करण्यासाठीच हत्या केल्याचा आरोप...तर अक्षय शिंदेचा मृत्य अतिरक्तस्त्रावानं, शवविच्छेदन अहवालात खुलासा...
💫 अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीचं पथक मुंब्रा पोलीस ठाण्यात...घटनास्थळाची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी...अक्षयचं पोस्टमॉर्टम पूर्ण.
💫 वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलारांविरोधात काँग्रेसच्या प्रिया दत्त निवडणूक लढण्याची शक्यता...काँग्रेसकडून प्रिया दत्त यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा.
💫 मुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुकीसाठी ५५ टक्के मतदान...१० जागांसाठी मिळून २८ उमेदवार मैदानात...२७ तारखेला मतमोजणी...
💫 मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. पनवेल जवळील पळस्पे जवळ खड्ड्यांमध्ये अडकून गाडीची चाकं निखळली.. पाच ते सहा वाहनांचं नुकसान
💫 मुंबईसह उपनगरात उद्या देखील मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट तर पुण्यात पावसाचा रेड अलर्ट
💫 सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरात मोठी उसळी.. एक तोळं सोनं ७७ हजारांवर.. तर चांदीचे दरही वाढले
💫 मेट्रो ३ चे तिकीट दर जाहीर, प्रवासासाठी मोजावे लागणार १० ते ५० रूपये, पहिल्या टप्प्यात दिवसाला ९६ फेऱ्या, दर सहा मिनिटांनी गाडी मुंबईच्या पोटातून प्रवास, सुसाट, गारेगार ; मेट्रो 3 मार्गिकेचा सुखद प्रवास
💫 नराधम अक्षय शिंदेचं एन्काऊंटर, विरोधकांची आरोपांची फायरिंग
💫 अमित शाह नागपुरात,नितीन गडकरी काश्मिरात; गैरहजेरीचा अर्थ काय नागरिकात चर्चा
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या