🌟परभणीतील श्री.शिवाजी महाविद्यालयातील बॉक्सिंग चॅम्पियन सुमित कानडे यांनी बॉक्सिंग स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक.....!


🌟बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल सुमित अनिल कानडे यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न🌟 

परभणी :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेतील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने प्रतिनिधित्व करत ७५ किलो वजनगटात सुमीत अनिल कानडे याने  सुवर्णपदक पटकावले या बद्दल समस्थ परभणीकर आंबेडकरी चळवळीतील सर्व वरिष्ठ मंडळी व परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने फटाके वाजवून सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रा. यशवंत मकरंद , विश्वजीत वाघमारे  यांनी आपले सुमित यांना अभिनंदन करून पुढील नेतृत्व आपल्या कडून देशाचे होईल अशा शुभेच्छा दिल्या यावेळी शहर कार्याध्यक्ष शेख नासेर,नगरसेवक पाशा कुरेशी, सर्वधर्मीय जयंती उत्सव समितीचे संयोजक प्रा.यशवंत मकरंद, भिमटायगर सेनेचे अर्जुन नाना पंडित, अल्पसंख्याक शहरजिल्हा अध्यक्ष मेहबूब पिंजारी,युवा नेते विश्वजीत वाघमारे, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य बंडु मेहत्रे, शहरजिल्हा सरचिटणीस अनिल कानडे, सावता परिषदेचे धोंडीराम सातवणे,नागेश खंदारे,मंथन नेवासेकर,रामजी जाधव ,संपादक- संघपाल अढागळे,विनायक कवडे,शेख जावेद भाई, आदींची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या